कऱ्हाड पोलिस ठाण्यातील 'गटबाजी'ने अवैध व्यावसायिकांना 'बळ'

कऱ्हाड पोलिस ठाण्यातील 'गटबाजी'ने अवैध व्यावसायिकांना 'बळ'

कऱ्हाड (जि. सातारा) : पोलिस ठाण्यातील "डीबी'चे काम चांगले आहे, असा दिखावा करणाऱ्या शहर पोलिस ठाण्यातील गुंडाविरोधी पथकातील म्हणजे "डीबी'च्या स्वयंघोषित कौतुकाचा फुगा नुकताच फुटला. गोळेश्वरला सुरू असलेला आयपीएल क्रिकेटवरील सट्टा बाजार सातारा स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून उद्‌ध्वस्त केला. त्यात चार लोकांना मुद्देमालासह अटक झाली. त्या कारवाईने डीबीतील कर्मचाऱ्यांमधील विसंवाद, अंतर्गत गटबाजी आणि त्यांचा हरवलेला एकजीनसीपणा अधिक ठळक झाला आहे. डीबीला अंतर्गत वादाने पोखरल्याचे कारवाईने स्पष्ट केले आहे. त्यामुळे जुगार, मटका, सट्टा, पिस्तूल, गावठी कट्टा सारख्या कारवाया करण्याऐवजी त्या लोकांशी डीबीची होणारी हातमिळवणी त्यांना अधिक गोत्यात आणू लागली आहे. त्यामुळे "डीबी'चा पूर्वीचा बाज हरवला आहे. 

शहर पोलिसांच्या "डीबी'कडून गुंडगिरी, अवैध व्यवसायावर कारवाई अपेक्षित आहे. मात्र, वर्षभरात त्यांनी जुजबी कारवाया केल्याने "डीबी'चा बाज उतरला आहे. वर्षभरात एखादीच कारवाई सांगण्यासारखी आहे. अन्यथा "डीबी'त सारेच साहेब आहेत, अशी स्थिती आहे. "डीबी'त अंतर्गत वाद आहे. त्यात तीन तीन गट आहेत. त्यांच्यात एकजीनसीपणा आणण्यासाठी कोणीच लक्ष घालत नाही, अशी स्थिती आहे. वास्तविक "डीबी'च्या प्रमुखांकडूनही मर्यादित काम होताना दिसते. पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर "डीबी'चा वचक हवा. मात्र, त्यांनाच जेवण घालून गप्प बसण्याची विनंती करण्याची नामुष्की "डीबी'वर आली आहे. कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना पायपूस नसतो. "डीबी' प्रमुखांच्या मर्जीतील लोक बेफाम आहेत. लॉकडाउनपासून "डीबी'चा दिखावा सध्या उघड होऊ लागला आहे. "डीबी'चे काही कर्मचारी अधिकाऱ्यांचे लॉकडाउनच्या काळात सिंगम स्टाइलचे गाणे लावून फिरतानाचे व्हिडिओ व्हायरल होत होते.

क्राईम रेट नियंत्रणासाठी युवक रडारवर; पोलिसांचा सोशल इंजिनिअरिंग फंडा
 
मात्र, तो केवळ दिखावा होता अनलॉकच्या काळात सध्या "डीबी' हतबल आहे, असेच दिसते. "डीबी'त अंतर्गत वाद आहे, त्याची जिल्हा पोलिसांत चर्चा आहे. त्यामुळे साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेला येथे हस्तक्षेप करून कारवाया कराव्या लागत आहेत. ती शहर पोलिस ठाण्यासह "डीबी'ला नामुष्कीजनक आहे. मात्र, त्याची पर्वा तेच करत नाहीत. शहरातील काही युवकांनी गोळेश्वरला सट्ट्याचा बाजार मोठ्या अलिशान बंगल्यात मांडला होता. त्याची माहिती "डीबी'ला होती. मात्र, त्यांच्यावर कारवाईऐवजी हातमिळवणीच झाल्याची चर्चा जास्त आहे. म्हणून साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना कऱ्हाडला येऊन कारवाई करावी लागली. त्यात चौघांना अटक झाली असून, चार लाखांचा मुद्देमालही जप्त केला आहे. "डीबी'ला एखादी घटना कळली, तर पहिल्यांदा चर्चा, त्यावर समेट होतो. तो फिसकटला, की कारवाई, असा शिरस्ता असल्याची चर्चा आहे. तीन महिन्यांत पाच पिस्तूल, कालचा सट्टा बाजार उद्‌ध्वस्त करणे या कारवायांसाठी सातारा पोलिसांना यावे लागले. त्यामुळे "डीबी'त शिरस्ता काही प्रमाणात सत्य आहे, असे म्हणण्यास वाव आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com