Satara News: पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! 'सुरूरकडून वाईकडे जाणारी वाहतूक १५ ऑगस्टपर्यंत बंद'; नेमकं काय कारण?
Important for Tourists: सुरूर ते वाई राज्यमार्गावरील रस्त्याचे व पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीस, तसेच रस्त्याचे काम करण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे १८ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
Surur to Wai Route Shut Temporarily; Here's the ReasonSakal
सातारा : रस्ता व पुलाचे काम सुरू असल्यामुळे वाई- सुरूर रस्त्यावरील सुरूरकडून वाईकडे जाणारी वाहतूक १५ ऑगस्टपर्यंत बंद करण्यात आली आहे. प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले आहे.