esakal | Corona Impact : साताऱ्यात लॉकडाउन उठणार?, उद्या महत्वपूर्ण बैठक
sakal

बोलून बातमी शोधा

Lockdown

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने जिल्ह्यात लॉकडाउन लागू केला आहे. सध्या वेळेच्या बंधनात अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू आहेत.

Corona Impact : साताऱ्यात लॉकडाउन उठणार?, उद्या महत्वपूर्ण बैठक

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : कोरोना संसर्गाचा (Coronavirus) वेग जिल्ह्यात कमी होऊ लागला आहे. दुसरीकडे नागरिकांसह व्यापाऱ्यांचा लॉकडाउनला (Lockdown) विरोध आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. १६) लॉकडाउनबाबत निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Guardian Minister Balasaheb Patil) यांच्या उपस्थितीत बैठक होणार असून, जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांशी चर्चा करून ते निर्णय घेणार आहेत. राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या जिल्ह्यात सांगली, सातारा व कोल्हापूरचा समावेश असून, येथील लॉकडाउन कायम ठेवण्याचा निर्णय झाला आहे; पण साताऱ्यात कमी होत असलेली कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता पालकमंत्री काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Important Meeting Of Minister Balasaheb Patil Regarding Lockdown In Satara District Tomorrow bam92)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने जिल्ह्यात लॉकडाउन लागू केला आहे. सध्या वेळेच्या बंधनात अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू आहेत. आता कोरोना बाधितांचा आकडा हळूहळू कमी होऊ लागला आहे, तर दुसरीकडे सातत्याच्या लॉकडाउनला नागरिक, तसेच व्यावसायिक वैतागले आहेत. हातावर पोट असलेल्यांचे सर्वाधिक हाल होऊ लागले आहेत. त्यामुळे मध्यंतरी कऱ्हाड, साताऱ्यातील व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून लॉकडाउनला विरोध केला होता. त्यामुळे लॉकडाउनवरून प्रशासनाविरोधात रोषाचे वातावरण जिल्ह्यात आहे. त्यातच कोरोना बाधितांचा आकडा सहाशे ते आठशेच्या दरम्यान स्थिर राहिलेला आहे. शेजारील जिल्ह्याच्या तुलनेत साताऱ्यातील पॉझिटिव्हिटी रेट कमी होऊ लागला आहे. त्यामुळे शुक्रवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थित होणाऱ्या बैठकीत आठवडाभराच्या परिस्थितीचा आढावा घेऊन आगामी लॉकडाउनबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

हेही वाचा: शिवेंद्रसिंहराजे पराभवाचा वचपा काढणार?

राज्य मंत्रिमंडळाकडून लॉकडाउन कायम

राज्य मंत्रिमंडळाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या जिल्ह्यातील लॉकडाउन कायम ठेवण्याचा निर्णय झाला आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्याचाही समावेश आहे. त्यामुळे साताऱ्यातील लॉकडाउनबाबत काय निर्णय घेतला जाणार याची सातारकरांत उत्सुकता आहे.

Important Meeting Of Minister Balasaheb Patil Regarding Lockdown In Satara District Tomorrow bam92

loading image