esakal | शिवेंद्रसिंहराजे पराभवाचा वचपा काढणार? उदयनराजेंची भूमिका गुलदस्त्यात!
sakal

बोलून बातमी शोधा

MP Udayanraje Bhosale

गत पराभवाची फेड यंदा एकहाती करण्‍यासाठीचे मनसुबे शिवेंद्रसिंहराजे आखत आहेत.

शिवेंद्रसिंहराजे पराभवाचा वचपा काढणार?

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : विलगीकरण कक्ष उद्‌घाटनावेळी पालिकेवर निशाणा साधत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांनी पालिकेच्या आगामी निवडणुकीचा (Satara Municipal Election) पट मांडण्‍यास सुरवात केल्‍याचे संकेत दिले. त्‍यांच्‍या संकेताला छेद देणारे प्रत्‍युत्तर साविआने (Satara Vikas Aghadi) दिले असून, आमदारांनी मात्र भाजपचा (Bhartiy Janta Party) गट जवळ करत बेरजेच्या राजकारणावर भर दिलेला आहे. आमदारांची बेरीज सुरू असताना खासदार गटाची भूमिका मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. आगामी काळात त्‍यांची भूमिका स्‍पष्‍ट होणार असलीतरी त्‍याकडे दोन गटांत विभागलेली भाजप आणि साताऱ्यात पाय रोवायच्या तयारीत असणाऱ्या राष्‍ट्रवादीचे (Nationalist Congress Party) लक्ष राहणार आहे. (MLA Shivendrasinharaje Bhosale And MP Udayanraje Have Started Preparations For The Upcoming Municipal Election bam92)

ऐनवेळी तुटलेले मनोमिलन, नाट्यमय घडामोडी, थेट नगराध्‍यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्‍या वेदांतिकाराजे, सर्वसामान्‍य या शब्‍दाभोवती फिरलेले वातावरण, उदयनराजेंनी (MP Udayanraje Bhosale) बांधलेली मोट, सातारा विकास आघाडीने मिळवलेल्‍या सत्तेची चर्चा अजूनही सातारकरांच्‍यात सुरू आहे. संस्‍थात्‍मक पातळीवर वर्चस्‍व राखणाऱ्या वेदांतिकाराजे (Vedantikaraje Bhosle) यांच्या पराभवाची सल अजूनही त्‍यांच्‍या समर्थकांत आहे. त्‍यामुळेच गत पराभवाची फेड यंदा एकहाती करण्‍यासाठीचे मनसुबे शिवेंद्रसिंहराजे आखत आहेत. राजकीय घडामोडी, सत्तासोपान, तांत्रिक-अतांत्रिक, राजकीय-अराजकीय कारणांमुळे दोन्‍ही राजे भाजपवासी झाले. दोन्‍ही राजे भाजपवासी असल्‍याने पालिकेवर एकछत्री भाजपचा अंमल राहणार असे चित्र त्‍या वेळी तयार करण्‍यात आले. मात्र, दोन्‍ही राजांनी आपला गट, आघाडी स्‍वतंत्र ठेवत सोयीनुसार आकडेमोडीसाठी भाजपचा वापर केला. याच काळात बॅकफुटवर गेलेल्‍या नगरविकास आघाडीच्‍या अकार्यक्षमतेचा फायदा साविआने पुरेपूर घेतला. निवडणूक नजरेसमोर ठेवत साविआला आरोपांच्‍या गुंत्‍यांत गुंतवून शिवेंद्रसिंहराजेंनी बेरजेवर भर दिला आहे. गट मजबूत करतानाच त्‍यांनी साविआच्‍या बाजूला झुकलेल्‍या मूळ भाजपला आपल्‍याकडे खेचण्‍यास सुरवात केली आहे.

हेही वाचा: झेडपीत 137 कर्मचाऱ्यांना पदोन्नती; 'आरोग्य'तील 60 जणांचा समावेश

नगरसेवक विजय काटवटे यांच्‍या कार्यक्रमावेळी शिवेंद्रसिंहराजेंनी पालिकेच्या कारभारावर टीका करत आमची देखील अडचण असल्‍याचे वक्‍तव्‍य केले होते. त्‍यातच वेळ आल्‍यावर बघू, असे म्‍हणत पालिकेच्‍या निवडणुकीत भूमिका घेण्‍याचे सूचित केले. त्‍यांचे हे वक्‍तव्‍य भाजपचा एकहाती अंमल आपल्‍या हाती असणे आवश्‍‍यक असल्‍याचे सूचित करणारे आहे. दरम्यान, आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपच्‍या भूमिकेबाबत विचारलेला प्रश्‍‍न शिवेंद्रसिंहराजेंच्‍या हाती सोपवत सर्वाधिकार त्‍यांच्‍याकडेच असल्‍याचे संकेत दिले. शिवेंद्रसिंहराजेंनी सुरू केलेले बेरजेच्‍या राजकारणावर पालिकेच्‍या आगामी निवडणुकीची (Satara Municipal Upcoming Election 2021) मदार अवलंबून राहणार आहे. निवडणुकीत साताऱ्यातील भाजपची ताकद दोन्‍ही गटांत विभागू नये, यासाठी भाजपचे वरिष्‍ठ सक्रिय असले, तरी त्‍यांच्‍या या प्रयत्नांना किती प्रतिसाद मिळतो, राष्‍ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सातारकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा: तीन आमदार, एक खासदार असूनही 'राष्ट्रवादी'ला मिळेना 'जिल्हाध्यक्ष'

दरबारी राजकारण मोडून काढावे लागणार

मी जवळचा का, तू जवळचा, या ईर्षेतून समर्थक आपले दरबारी पद, महत्त्‍व अबाधित राखण्‍यासाठी दिवसरात्र धडपडत असतात. याच धडपडीतून झालेली कटकारस्‍थाने, षडयंत्राला कंटाळून दरबारी राजकारणात काडीचा रस नसलेले अनेक जण आपोआप बाजूला पडत चालले आहेत. आगामी काळात या दरबारी राजकारणाला पुन्‍हा एकदा वेग येण्‍याची शक्‍यता असून, ते दरबारी राजकारण प्राधान्‍याने शिवेंद्रसिंहराजेंना मोडून काढावे लागणार आहे.

MLA Shivendrasinharaje Bhosale And MP Udayanraje Have Started Preparations For The Upcoming Municipal Election bam92

loading image