पाच जिल्ह्यांच्या एसपींना साताऱ्यात आयजींचा कानमंत्र!

पाच जिल्ह्यांच्या एसपींना साताऱ्यात आयजींचा कानमंत्र!
Updated on

सातारा : कोल्हापूर परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यात नुकतेच सर्व पोलिस अधीक्षक नव्याने हजर झाल्यानंतर विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी सोमवारी साताऱ्यात त्याबाबत महत्वपूर्ण बैठक घेतली. कोल्हापूर रेंजमधील 'क्राइम कंट्रोलसह सध्या कोरोनाचा सुरु असलेला संसर्ग व येत्या काळातील नवरात्रोत्सव सण, उत्सव याबाबत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या सूचना विशेष पोलिस महानिरीक्षक (आयजी) मनोज लोहिया यांनी पाचही एसपींना दिल्या. 

दरम्यान, आयजींसह पाचही पोलिस अधिकारी नवे असल्याने यावेळी एकमेकांची 'ओळख परेड' देखील झाली. राज्यात पोलिस दलात सध्या बदल्यांचे सत्र सुरु आहे. गेल्या महिन्याभरात तीनवेळा आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. या बदल्यांमध्ये कोल्हापूर परिक्षेत्रात देखील पाचही जिल्ह्यात पोलिस अधीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये खुद्द आयजी मनोज लोहिया यांनी देखील एक महिन्यापूर्वी कोल्हापूर रेंजचा चार्ज घेतला आहे. त्यानंतर पाचही जिल्ह्यात सर्व पोलिस अधीक्षकांच्या बदल्या झाल्या असून नव्याने त्यांनी त्या-त्या ठिकाणचा चार्ज घेतला आहे. पुणे ग्रामीणला डॉ. अभिनव देशमुख, सोलापूर ग्रामीणला तेजस्वी सातपुते, कोल्हापूर शैलेश बलकवडे, सातारला अजयकुमार बन्सल तर सांगली दिक्षीत गेडाम यांनी कार्यभार स्वीकारला आहे.

प्रारंभी सातारा पोलिस मुख्यालयात आयजी मनोज लोहिया यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर पाचही जिल्ह्यातील पोलिस अधीक्षकांची आयजींनी बैठक घेतली. ही बैठक देखील सातारा एसपींच्या दालनातच झाली. सुमारे दीड तास मॅरेथॉन बैठक चालली. यावेळी सुरुवातीला आयजींची ओळख करुन दिल्यानंतर पाचही जिल्ह्यातील पोलिस अधीक्षकांची ओळख करुन घेण्यात आली. आयजी यांनी यावेळी जिल्हानिहाय पोलिस अधीक्षकांचा आढावा घेतला. यावेळी पाचही जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maratha Heritage Comes Alive as Satara Museum Adds New Galleries on Shivaji Era
Mahendra Crowned Hind Kesari as Pune’s Prithviraj Finishes Runner-Up
Political Buzz Intensifies in Karad as Krishna Sugar Factory Election Process Begins
Satara Municipal Politics Heats Up as Shivendrasinhraje Calls for Unity and Discipline
Marathi News Esakal
www.esakal.com