"नीरा उजवा, त्यानंतर धोम- बलकवडी कालव्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यात फलटण, लोणंद एमआयडीसीमध्ये पुन्हा शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत."
सांगवी : नीरा उजवा कालव्याचे पाणी जर सांगोला, माळशिरस तालुक्याला दिले, तर फलटणच्या वाट्याचे पाणी लाभक्षेत्रातील लोकांना मिळणार नाही. तालुक्यातील कित्येक शेतकरी हे पाण्यापासून वंचित राहतील. तालुक्यात २० लाख टन उसाचे उत्पादन होते. जर फलटणच्या वाट्याचे पाणी दिले, तर तालुक्यातील ऊस उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो. तालुक्यात चार साखर कारखाने आहेत. त्यामुळे फलटणच्या वाट्याचे पाणी देणे (Phaltan Water) चुकीचे आहे. मी पाणीदार नसलो तरी जे पाणीदार आहेत, त्यांनी हा प्रश्न सोडवावा, असे आमदार रामराजे नाईक- निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.