

Beneficiaries checking their application status under the Ladki Bahin scheme in Satara district.
Sakal
सातारा : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतील जिल्ह्यात ८५ हजार ६४ लाभार्थ्यांच्या अर्जात त्रुटी आढळून आल्या होत्या. या लाभार्थ्यांपैकी डिसेंबर २०२५ पर्यंत दिलेल्या मुदतीच ३५ हजारांहून अधिक महिलांनी केवायसी पूर्ण केल्याने पुढील हप्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, अद्यापही ५० हजारांहून अधिक महिलांची केवायसी प्रलंबित आहे. या लाभार्थ्यांना ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली असून, मुदतीत केवायसीची प्रक्रिया न केल्यास हप्ते बंद होणार आहेत.