esakal | पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न; पती फरार
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

ही घटना बुधवारी सकाळी सातच्या सुमारास घडली.

पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न; पती फरार

sakal_logo
By
अभिजीत खुरासणे

महाबळेश्वर (सातारा): महाबळेश्वर बाजारपेठेपासून नजीक नगरपरिषद शाळा क्र. 01 च्या पाठीमागील बाजूस राहणाऱ्या घोडे व्यवसायिक राजेंद्र उर्फ राजू महादेव जाधव (रा. स्कूल मोहल्ला) याने पत्नी बायना राजेंद्र जाधव हिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा: सातारा शहराचे होणार गुगल मॅपिंग! नगरपालिकेची तयारी

ही घटना बुधवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. घटनेननंतर या परिसरात गर्दी जमली. या गर्दीचा फायदा घेत महिलेचा पती राजेंद्र उर्फ राजू जाधव यांनी पळ काढला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या दुर्दैवी घटनेत बायना जाधव गंभीररित्या जखमी झाल्या आहे. त्यांच्या मुलाने त्यांना प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात महाबळेश्वर येथे नेण्यात आले.

loading image
go to top