esakal | सातारा शहराचे होणार गुगल मॅपिंग! नगरपालिकेची तयारी
sakal

बोलून बातमी शोधा

google maps

हे मॅपिंग पूर्ण झाल्‍यानंतर शहरातील विविध मालमत्ता, जागा, रस्‍ते व इतर मिळकतींची माहिती शासनाबरोबरच नागरिकांना एका क्‍लिकवर उपलब्‍ध होणार आहे.

सातारा शहराचे होणार गुगल मॅपिंग! नगरपालिकेची तयारी

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा: सातारा शहरातील शासकीय, खासगी मिळकती, तसेच रस्‍ते, बागा व इतर जागांचे शासनाच्‍या धोरणानुसार जीआयएस मॅपिंग होणार असून, त्यासाठीची तयारी पालिकेने केली आहे. हे मॅपिंग पूर्ण झाल्‍यानंतर शहरातील विविध मालमत्ता, जागा, रस्‍ते व इतर मिळकतींची माहिती शासनाबरोबरच नागरिकांना एका क्‍लिकवर उपलब्‍ध होणार आहे.

हेही वाचा: सातारा : भुतेघर, वाहिटे, बोंडारवाडीची भूगर्भ शास्त्रज्ञांकडून पाहणी

सातारा शहराचा विस्‍तार दिवसेंदिवस वाढत असून, नुकत्‍याच झालेल्‍या हद्दवाढीनंतर शाहूपुरी, विलासपूर या ग्रामपंचायती, तसेच पिरवाडी, शाहूनगर, विसावा नाका आदी उपनगरे पालिकेच्‍या हद्दीत आली आहेत. हद्दवाढीमुळे शहराचा भौगोलिक विस्‍तार वाढल्‍याने ‍त्याठिकाणची प्रशासकीय सुविधा सुरळीत ठेवण्‍याबरोबरच नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्‍यावर पालिकेला जास्‍तीचे लक्ष द्यावे लागत आहे.

हेही वाचा: सातारा : काडोलीजवळ गाईंचा टेंपो ताब्यात; पाटणमधील तिघांवर गुन्हा

शहराच्‍या विविध भागांत असणाऱ्या शासकीय, तसेच खासगी मिळकती, बागा, रस्‍ते, गटार व इतर सुविधांचे आराखडे, नकाशे सध्‍या कागदी स्वरूपात पालिकेकडे, तसेच शासनाच्‍या इतर यंत्रणांकडे उपलब्‍ध आहेत. आराखडे, नकाशे हाताळणीवेळी त्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्‍याने ते मिळवताना पालिकेस, तसेच नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना नेहमीच करावा लागतो.

हेही वाचा: सातारा जिल्हा परिषदेचा दिल्लीमध्ये डंका

हाताळणीवेळी आराखडे, नकाशांच्‍या झालेल्‍या नुकसानीमुळे अचूक माहिती मिळण्‍यात अडचणी येऊन त्‍याचा परिणाम शासकीय योजनांच्‍या अंमलबजावणीवर होत असतो. हे टाळण्‍यासाठी शासनाने सर्वच शहरे, ग्रामपंचायतींमधील मिळकतींचा जीआयएस मॅपिंग करण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सातारा पालिकेच्‍या हद्दीतील शासकीय मिळकती, खासगी मिळकती, बस स्‍थानके, मैदाने, रिकाम्‍या जागा, रस्‍ते, गटारे, ओढे, बागा यांचे जीआयएस मॅपिंग करण्‍यात येणार आहे. हे काम शासनाने एका संस्‍थेला दिले असून, त्‍यांना मॅपिंगसाठी आवश्‍‍यक असणारे जुने नकाशे, आराखडे देण्‍यासाठीची यंत्रणा सातारा पालिकेने तयार केली आहे.

हेही वाचा: सातारा : अनैतिक संबंधातून पत्नीसह प्रेयसीचा काढला काटा

हे काम पूर्ण झाल्‍यानंतर शासकीय मिळकती, रस्‍ते व इतर ठिकाणी झालेले अतिक्रमण व इतर बाबी पालिकेच्‍या निदर्शनास येण्‍यास मदत होण्‍याबरोबरच नागरिकांचा नकाशे, आराखडे मिळवण्‍यासाठीच्‍या होणाऱ्या श्रमाची बचत होणार आहे.

हेही वाचा: ऑलिम्पियन प्रवीण जाधवचं कुटुंब सातारा जिल्हा सोडणार

शहरातील मालमत्तांचे जीआयएस मॅपिंग करण्‍याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्‍यासाठीची तयारी सातारा पालिकेने केली आहे. हे काम शासनाने नेमलेली त्रयस्‍थ यंत्रणा करणार असून, त्‍यांना आवश्‍‍यक असणारी माहिती, आराखडे, नकाशे पालिकेतर्फे पुरविण्‍यात येणार आहे. यासाठीची तयारी पूर्ण झाली असून, हे काम प्रत्‍यक्षात लवकरच सुरू होईल.

- अभिजित बापट, मुख्‍याधिकारी, सातारा नगरपालिका

loading image
go to top