कऱ्हाडसह मलकापूर पालिकेचाही डंका; नगरपंचायत गटात राज्यात तृतीय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Majhi Vasundhara Awards

राज्य शासनाने माझी वसुंधरा अभियान यंदापासून राबविले आहे. त्यात 680 संस्थांनी सहभाग घेतला होता.

कऱ्हाडसह मलकापूर पालिकेचाही डंका; नगरपंचायत गटात राज्यात तृतीय

मलकापूर (सातारा) : माझी वसुंधरा अभियानात (Majhi Vasundhara Awards) नगरपंचायत, लहान पालिकांच्या गटातील 130 पालिकामध्ये मलकापूर पालिकेने (Malkapur Municipality) राज्यात तृतीय क्रमांक पटकावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामीण विकासमंत्री हसन मुश्रीफ, सचिव मनीषा म्हैसकर यांच्या उपस्थितीत आज बक्षीस वितरण झाले. ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे मलकापूरला सन्मानित केले आहे. (IN Majhi Vasundhara Awards Malkapur Municipality Get Third Prize In The State In The Nagar Panchayat Group)

राज्य शासनाने (Maharashtra Government) माझी वसुंधरा अभियान यंदापासून राबविले आहे. त्यात 680 संस्थांनी सहभाग घेतला होता. छोट्या पालिका व नगरपंचायतींचा स्वतंत्र गट केला होता. त्यात 130 संस्था सहभागी होत्या. त्यामध्ये मलकापूरचा तिसरा क्रमांक आला आहे. त्यांना किती पारितोषिक मिळाले ते अद्यापही जारी झालेले नाही. ऑनलाइन सोहळ्यात येथून पालिकेचे नगरसेवक, अधिकारी सहभागी झाले होते. मलकापूरचे नाव जाहीर होताच येथे आनंद साजरा झाला. मलकापूरने यापूर्वी स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये पालिकेचा देशात 25 वा, पश्‍चिम देशात अकरावा, तर राज्यात दहावा क्रमांक पटकावला आहे.

हेही वाचा: माझी वसुंधरा पुरस्काराला कऱ्हाडची गवसणी; राज्यात पालिकेचा दुसरा क्रमांक

अभियानात नोडल अधिकारी मनीषा फडतरे, पुंडलिक ढगे, ज्ञानदेव साळुंखे, राजेश काळे, शशिकांत पवार, प्रियांका धनवडे, धन्वंतरी साळुंखे, प्रियांका तारळेकर, राहुल अडसूळ, आत्माराम मोहिते व श्रीकांत शिंदे, रमेश बागल यांनी काम केले आहे. पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती उपाध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली. ते म्हणाले, ""मलकापूरने यापूर्वी लोकसहभागातून विविध नावीन्यपूर्ण योजना राबवून यशस्वी केल्या आहेत. त्यात नळ पाणीपुरवठा, सोलर सिटी, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया, कन्यारत्न योजना आदीसह अन्य योजनाही राबविल्या आहेत. ऊर्जा बचतीसाठी महाराष्ट्र ऊर्जा अभिकरण मंडळाकडून प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित केलेला आहे.''

IN Majhi Vasundhara Awards Malkapur Municipality Get Third Prize In The State In The Nagar Panchayat Group

loading image
go to top