Satara News : नवीन वर्षात उडणार प्रचाराचा धुरळा, वॉर्ड रचना सुरू होणार
विधानसभेच्या निवडणुकीनंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. २०२४ मधील निवडणूक प्रलंबित असलेल्या १२४ ग्रामपंचायती आहेत. राज्य निवडणूक आयोगाने १५ जानेवारी २०२५ पर्यंत वॉर्ड रचना करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अंतिम प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता आहे.
सातारा : विधानसभेच्या निवडणुकीचा धुरळा खाली बसताना आता जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा धुरळा नव्या वर्षात उडणार आहे. यामध्ये २०२४ मधील विविध कारणांनी निवडणुका पुढे ढकललेल्या १२४ तसेच २०२५ मध्ये मुदत संपणाऱ्या १४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.