बा. सी. मर्ढेकर स्मारक लोकार्पणाचा अधिकार हवाय ग्रामस्थांना

बा. सी. मर्ढेकर स्मारक लोकार्पणाचा अधिकार हवाय ग्रामस्थांना

सायगाव (जि. सातारा) : मर्ढे (ता. सातारा) येथे नवकवी बा. सी. मर्ढेकर यांच्या स्मृत्यर्थ 48 लाख 76 हजार रुपये खर्च करून उभारण्यात आलेले स्मारक उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. आज (ता. एक डिसेंबर) नवकवी मर्ढेकर यांची 111 वी जयंती असल्याने या स्मारक उद्‌घाटनाची चर्चा साहित्य क्षेत्रात सुरू झाली आहे.
 
मर्ढे हे "बा. सीं.'चे मूळगाव. सन 1956/60 दरम्यान मान्यवर साहित्यिकांकडून मर्ढे येथे "बा. सीं.'च्या स्मारणार्थ स्मारक बांधण्याची कल्पना मांडण्यात आली. 1966 मध्ये सातारा येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाप्रसंगी काकासाहेब गाडगीळांच्या अध्यक्षतेखाली मर्ढे येथे स्मारक व राष्ट्रीय महामार्ग आनेवाडी येथे काव्यशिल्प उभारण्याचा ठराव करण्यात आला. अखेर सन 1993 च्या सातारा येथील 66 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात स्मारकाच्या मागणीला पुन्हा गती आली. त्यानंतर निधी मंजूर होऊन सन 2000 मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. 2009 मध्ये पुन्हा तत्कालीन पालकमंत्री रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन करून कामाला प्रत्यक्षदर्क्षी सुरुवात करण्यात आली आणि सन 2012 मध्ये काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित स्मारक समितीकडे इमारत सोपवली; पण "नवा राजा नवा कायदा' याप्रमाणे अधिकारी बदलले. समितीची फाईल सरकारी कार्यालयातील दप्तरात धूळखात पडली. तिच्याकडे कुणीही पाहिलेच नाही. मर्ढेकर ग्रामस्थांसह साहित्यिक मात्र स्मारकाच्या उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत.

'पदवीधर'च्या प्रचारातील रस्सीखेचामुळे सातारकरांची मतदानातही आघाडी
 

""गेली कित्येक वर्षे उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या व खऱ्या अर्थाने मर्ढे गावचे वैभव असणाऱ्या बा. सी. मर्ढेकर स्मारकाचे उद्‌घाटन करून त्याचे लोकार्पण करावे. अन्यथा शासनाने ग्रामस्थांना सर्वाधिकार द्यावेत म्हणजे आम्ही तरी याबाबत निर्णय घेऊ व हे स्मारक खुले करू.'' 
- शरद शिंगटे, सरपंच, मर्ढे

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com