esakal | तेरे जैसा यार कहाँ! वडुजात मित्राच्या मदतीला धावली 'मैत्री'
sakal

बोलून बातमी शोधा

Isolation

तेरे जैसा यार कहाँ! वडुजात मित्राच्या मदतीला धावली 'मैत्री'

sakal_logo
By
आयाज मुल्ला

वडूज : हुतात्मा स्मृती आयसोलेशन कक्षामुळे प्राथमिक अवस्थेतील रूग्णांना चांगला दिलासा मिळेल, असे मत गटविकास अधिकारी रमेश काळे यांनी व्यक्त केले. पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे मित्र मंडळ, येथील जनता गॅरेज मित्र मंडळ यांच्या माध्यमातून सातेवाडी (ता. खटाव) येथील मधुमाला सांस्कृतिक केंद्रात सुरू करण्यात आलेल्या आयसोलेशन कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख, नगराध्यक्ष सुनिल गोडसे, माजी सरपंच हणमंतराव कोळेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष मोरे, धनंजय क्षीरसागर, आनंद पवार, महेश इगावे, धनाजी गोडसे, लखन पवार, सनी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. काळे म्हणाले, काही रूग्णांच्या केवळ टेस्ट पॉझिटीव्ह येत असतात, मात्र त्यांना आजाराची लक्षणे नसतात. अशा काही रूग्णांना स्वत:च्या घरी विलगीकरणाची सुविधा नसेल त्यांच्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. संदीप मांडवे यांनी सर्वसामान्य रूग्णांना दिलासा देण्यासाठी हे केंद्र सुरू केल्याचे सांगितले. या कक्षाच्या उभारणीसाठी युवकांचे मोठे सहकार्य लाभल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी नगराध्यक्ष गोडसे, धनंजय क्षीरसागर, धनाजी गोडसे यांचेही मनोगत झाले. दरम्यान, माजी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, विपूल गोडसे, इम्रान बागवान आदींनी या कक्षाला भेट दिली.

'दोन भावांच्या निधनानंतरही चार महिने कोरोनाशी लढले अन् अखेरच्या क्षणी जिंकले'

मित्राच्या मदतीला धावली मैत्री..

आकाश सूर्यवंशी या युवकाला गेल्या काही दिवसांपूर्वी त्रास होऊ लागल्यानंतर त्याच्या मित्रांनी ऑक्सिजन बेडसाठी शोधाशोध सुरू केली. मात्र, त्यांना तातडीने बेड उपलब्ध होत नव्हता अखेरीस त्यांनी ही बाब माजी सभापती संदीप मांडवे यांना सांगितल्यानंतर त्यांनी सातारा येथे संपर्क साधून तातडीने बेड उपलब्ध करून दिला. त्यामुळे आकाश याला नवजीवन मिळाले. गावोगावच्या रूग्णांना जाणवणाऱ्या या अडचणींना श्री. मांडवे हे कर्तव्यतत्परतेने धावून जात आहेत. त्यामुळे आपल्या गाव परिसरातच असा आयसोलेशन कक्ष सुरू झाल्याने रूग्णांना दिलासा मिळाला आहे.

Edited By : Balkrishna Madhale

loading image