esakal | होम आयसोलेशनमधील रुग्ण स्प्रेडर; उत्तर खटावात रुग्णसंख्येचा उंचावला आलेख
sakal

बोलून बातमी शोधा

Home Isolation

प्रशासनाने वारंवार आवाहन करूनदेखील कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले काही रुग्ण आरोग्य विभागाशी वाद घालून होम आयसोलेशनमध्येच राहत आहेत.

होम आयसोलेशनमधील रुग्ण स्प्रेडर; उत्तर खटावात रुग्णसंख्येचा उंचावला आलेख

sakal_logo
By
ऋषिकेश पवार

विसापूर (सातारा) : उत्तर खटावमधील कोरोनाची (Coronavirus) सौम्य लक्षणे असलेले बहुतांश रुग्ण कोविड सेंटर (Covid centre) किंवा आयसोलेशन सेंटरला बगल देत घरातच आयसोलेट होत आहेत. मात्र, हे रुग्ण आयसोलेशनच्या नियमांना तिलांजली देत विनाकारण घराबाहेर पडत असल्याने संक्रमणाचा धोका बळावत आहे. परिणामी, या भागात कडक निर्बंध (Lockdown) लाऊनही रुग्णसंख्येचा आलेख उंचावत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यास आळा घालण्यासाठी रुग्णांना होम आयसोलेट न करता कोविड केअर सेंटर किंवा गावोगावी ग्रामस्तरीय समित्यांनी उभारलेल्या आयसोलेशन सेंटरमध्येच ठेवणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. (Incidence Of Coronavirus Increased In The North Khatav Satara Marathi News)

प्रशासनाने वारंवार आवाहन करूनदेखील कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले काही रुग्ण आरोग्य विभागाशी वाद घालून होम आयसोलेशनमध्येच (Home Isolation) राहत आहेत. परंतु, अनेकांच्या घरी पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने हे होम आयसोलेशन नियमानुसार होत नसल्याचे वास्तव समोर येत आहे. स्वतःसह इतरांच्या जीविताची काळजी घेण्याची गरज असताना काही कोरोनाबाधित विनाकारण घराबाहेर फिरत असल्याने येथील परिसरात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. काही रुग्ण आयसोलेशनबाबत आडमुठेपणाची भूमिका घेत असल्याने स्थानिक आरोग्य प्रशासन हतबल आहे.

दरम्यान, बाधित रुग्णावर सात दिवस लक्ष ठेवण्याची गरज असते. कारण त्या रुग्णाची ऑक्‍सिजन पातळी खाली येऊन प्रकृती बिघडण्याची शक्‍यता असते. तसेच बाधित रुग्णांमुळे कोरोनाचा प्रसार अधिक होण्याची शक्‍यता असल्यामुळे शासनाच्या आयसोलेशन सेंटरमध्ये रुग्णांनी दाखल होणे गरजेचे असल्याचे पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य गुजर यांनी सांगितले.

हेही वाचा: व्हेंटिलेटरअभावी मृत्यूस जबाबदार कोण?; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष ठरतेय मारक

खटाव तालुक्‍यातील प्रत्येक गावामध्ये आयसोलेशन सेंटर उभारण्यात आली आहेत. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी होम आयसोलेट होण्याचा आग्रह न धरता शासकीय सेंटरमध्ये दाखल व्हावे, जेणेकरून गावातील तसेच घरातील नागरिकांच्या संसर्गाचा धोका टळेल.

- गणेश बोबडे, तलाठी, पुसेगाव

Incidence Of Coronavirus Increased In The North Khatav Satara Marathi News