esakal | जरंडेश्वर कारखान्यावर Income Tax ची धाड; CID चे अधिकारी फिरले माघारी I Jarandeshwar Factory
sakal

बोलून बातमी शोधा

Jarandeshwar sugar factory

चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील जरंडेश्वर शुगर मिलवर आयकर विभागाने छापेमारी केल्याची माहिती समोर येत आहे.

जरंडेश्वर कारखान्यावर Income Tax ची धाड; CID चे अधिकारी फिरले माघारी

sakal_logo
By
राजेंद्र वाघ

कोरेगाव : चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील जरंडेश्वर शुगर मिलवर (Jarandeshwar Sugar Mill) आयकर विभागाने छापेमारी (Income Tax Department) केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, तीन दिवस कारखाना बंद ठेवण्यात आल्याचे सुरक्षारक्षकांकडून सांगण्यात आले. मात्र, त्यामागचे कारण त्यांनी स्पष्ट केले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सातच्या सुमारास चार वाहनांतून आलेल्या आयकर विभागाच्या अधिकारी, पोलिसांनी कारखान्यात प्रवेश करून कारवाई सुरू केली. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कालच जरंडेश्वर कारखान्यावर येऊन 'जरंडेश्वर'चा मालक कोण? या प्रश्नाचे उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी द्यावे, अशा शब्दांत आव्हान दिले होते.

हेही वाचा: 24 घोटाळे उघड, त्यात ठाकरे सरकारमधील 18 नेत्यांची नावं : सोमय्या

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे, आज (गुरुवार) ही कारवाई सुरू आहे. दरम्यान, कारखान्याचे गेट बंद असून, आतमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही. कारखान्याचे सुरक्षा रक्षक गेटच्या बाहेर मुख्य रस्त्यावर थांबले असून, ते गेटजवळ कोणालाही येऊ देत नाहीत. दरम्यान, दुपारी एका शासकीय वाहनातून सीआयडीचे अधिकारी कारखाना स्थळावर आले, परंतु, त्यांनाही कारखान्यामध्ये प्रवेश मिळू न शकल्याने ते माघारी फिरले.

हेही वाचा: अजित पवारांच्या अडचणीत वाढ?निकटवर्तीयांकडे income tax छापेमारी

loading image
go to top