गारवा देणारी रसवंतीगृहे महागाईच्या चक्रात

आर्थिक विवंचनेत वाढ; वीजटंचाईसह वस्तूंच्या किमती वाढल्याने रस महागला
juice centre
juice centresakal

ओगलेवाडी : कडक उन्हाळ्यात गारवा देणाऱ्या रसवंतीगृहांना महागाईचा तडाखा बसला आहे. त्यामुळे रसवंतीगृहांनी घरघर लागली आहे. उसापासूनच्या रसाच्याही किमती वाढल्या आहेत. कोरोनाच्या संकटानंतर रसवंती व्यवसाय दोन वर्षांनंतर पुन्हा सावरण्याच्या मार्गावर होता. मात्र, महागाईने तो आर्थिक चक्रात अडकला आहे.

गुढीपाडव्यानंतर ग्रामीण भागातील जत्रा सुरू झाल्याने त्यास अच्छे दिनाची प्रतीक्षा होती. तथापि, व्यावसायिक वीज वापराच्या दरात १५ टक्क्यांची मोठी वाढ झाली. वीज टंचाई व भारनियमनाच्या संकटास रसवंतीगृहांना आता तोंड देण्याची वेळ ओढवली आहे. विजेचे दर वाढल्याने व टंचाईने बर्फाच्या लहान लादीचा भाव सुमारे १५० रुपयांपर्यंत नुकताच वाढला आहे. खत व औषधांचे आणि मजुरीचे दर वाढल्याने रसासाठी लागणाऱ्या उसाच्या भावातही वाढ झाली. तसेच उन्हाळ्यामुळे लिंबांना मोठी मागणी वाढल्याने लिंबाचा भाव नगास तीन ते चार रुपयांवरून आठ ते दहा रुपयांपर्यंत वाढला आहे. अवेळी येणाऱ्या पावसामुळेही व्यवसायावर परिणाम झाल्याचे सैदापूरचे रसवंतीगृह चालक श्री. कदम यांनी सांगितले.

फळांसह लस्सी, ज्यूसचे दरही वाढले

बाजारात पाण्याचे माठाची किंमत २०० ते ३०० रुपये झाली आहे. दूध, दही, साखर व बर्फ आणि फळांचे भावही वाढल्याने लस्सी, ज्यूसचे दर वाढले व लिंबांचे भाव भडकल्याने लिंबू सरबत ग्लासचा भाव १५ रुपये झाला आहे. कलिंगड नगाचा दर ३० ते ५० रुपये, द्राक्ष ८० ते १०० रुपये, काकडी ६० रुपये किलो झाली आहे. चिक्कू ६० रुपये किलोचा भाव आहे. उन्हाळी टोप्यांना मागणी वाढली असून त्याची किंमत ५० ते ६० रुपये आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com