कऱ्हाड - विधानसभा निवडणुकीवेळी कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातील कापीलमध्ये झालेल्या बोगस मतदार प्रकरणाची सखोल चौकशी करावी, या मागणीसाठी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य गणेश पवार आजपासून तहसीलदार कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषणास सुरूवात केली..गोळेश्वरच्या मतदार यादीतही ७५ जण असेच संशयास्पद आहेत, त्यांच्याही चौकसीला टाळाटाळ करणाऱ्यांची चौकसी करावी, या मुख्य मागणीसह अन्य काही मागण्यासाठी पवार यांनी उपोषण सुरू केले आहे. तहसीलदार कार्यालयाबाहेर मंडप टाकून ते उपोषणास बसले आहेत. त्यांना विविध नागरीकांनी भेटून पाठिंबा दिल्याचाही दावा त्यांनी केला आहे. .कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार यादीबाबत दोन दिवसापूर्वी पवार यांनी याच मागणीसाठी पत्रकार परिषद घेवून प्रशासकीय आधिकाऱ्यांना आव्हान दिले होते. त्या विरोधात प्रातांधिकारी अतुल म्हेत्रे यांनीही उलट पत्रकार परिषद घेत तक्रारदार पवार यांनाच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे प्रती आव्हान दिले होते. त्यामुळे बोगस मतदार प्रकरण जटील झाले आहे.पवार यांनी जाहीर केल्या प्रमाणे आजपासून उपोषण सुरू केले. ते आजही त्यांच्या मागण्यांचा पुनरूच्चार करत त्यावर ठाम आहेत. कापीलच्या नऊ बोगस मतदारांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय उपोषण माघार घेणार नाही, असे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. ज्यांचे कापील गावात घर नाही, जमीन नाही, रेशनकार्ड नाही, शिवाय ते गावचे रहिवासी नाहीत, त्यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे विधानसभेला मतदान केले आहे..त्यांची नावे कशाच्या आधारे मतदार यादीत नोंदली गेली, याची उत्तरे प्रशासनाला देता आलेली नाहीत. बीएलओ, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याची पडताळणी का केली नाही, याचाही चौकशी होणे गरजेचे आहे, असीही मागणी त्यांनी यावेळी केली त्यामुळे आता प्रशासनाची काय भुमिका असणार याकडे लक्ष लागले आहे.उपोषणाबाबत पवार म्हणाले, एका महिला मतदार आहे, तीचे आधार कार्डच्या पुराव्यावर कापील येथे मतदान जाले आहे. कापील व गोळेश्वर येथे अनोळखी व्यक्ती मतदार म्हणून नोंदवले गेले आहेत. त्या सगळ्यांची चौकशी करण्याची आमची मागमी आहे. त्यावर आम्ही ठाम आहोत..प्रियांका श्रीकांत चव्हाण, रूथ माईकल काळे, स्वाती सुनील मोरे, शीतल सुरेश सावंत, किशोर जयवंत जाधव, सुरेश बबन मदने, मधुकर डिसले, सुनीता सुरेश जाधव, स्वाती हणमंत पाटील अशा नावाच्या व्यक्ती कापीलच्या रहिवासी नाहीत, तरीही त्यांची नावे कापीलच्या मतदार यादीत आहेत.त्या चौकशीचा आमचा आजही आग्रह आहे. त्या मतदारांनी ग्रामपंचायत, लोकसभा अथवा अन्य निवडणुकीत मतदान केलेले नाही. त्याचे पुरावे देवूनही यंत्रणा त्याची तपासमी करताना दिसत नाही. उलट आम्हालाच पोलिस ठाण्यात जाण्याचा सल्ला देणे योग्य नाही..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.