
कास : स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपती भवन येथे होणाऱ्या कार्यक्रमांचे विशेष निमंत्रण आले आहे. परळी येथील नवउद्योजिका अंजना शंकर कुंभार यांना टपाल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन निमंत्रित केले. त्यामुळे राष्ट्रपती भवन तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या लाल किल्ल्यावर ध्वजवंदन करणार आहेत, अशा कार्यक्रमास निमंत्रित करण्यात आलेल्या त्या जिल्ह्यातील एकमेव नवउद्योजिका ठरल्या आहेत.