
सातारा : कडाक्याची थंडी, वादळी वाऱ्यासह कोसळणारा मुसळधार पाऊस अंगावर झेलत साताऱ्यातील यश विवेक मुचंडी यांनी हॅम्बुर्ग येथे झालेल्या आयर्नमॅन हॅम्बुर्ग २०२५ (२२६.३ किलोमीटर) स्पर्धेत ठसा उमटवला. यामध्ये ३.८ किलोमीटर पोहणे, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२.२ किलोमीटर (मॅरेथॉन) धावणे यांचा समावेश होता.