esakal | Cyclone Tauktae : चक्रीवादळानं नुकसान झालंय?, महावितरणला द्या 'ही' माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

MSEDCL

Cyclone Tauktae : चक्रीवादळानं नुकसान झालंय?, महावितरणला द्या 'ही' माहिती

sakal_logo
By
यशवंतदत्त बेंद्रे

तारळे (सातारा) : कोकण किनारपट्टीवरून चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) सोसाट्याचा वारा वाहत आहे. त्यामुळे पडझड व नुकसान होऊन वीजपुरवठा खंडित होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेऊन महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय महावितरण (MSEDCL) कार्यालयाने केले आहे. (Inform MSEDCL Of The Damage Caused By The Cyclone Tauktae)

वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी व अधिकारी सदैव तत्पर असतील. परंतु, चक्रीवादळाचा वेग जास्त असल्यास महावितरणच्या खांब व तारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्या वेळेस वीजपुरवठा पूर्ववत करण्यास बिलंब लागू शकतो. महावितरणचे खांब कोसळले, तारा तुटून पडल्यास मनुष्य, जनावरे हानी होऊ शकते. कुठेही महावितरणचे खांब अथवा तारा तुटून पडल्यास त्या भागातील नागरिकांनी त्वरित संपर्क करावा, त्याची माहिती महावितरण कार्यालयास, कर्मचारी अथवा अभियंत्यांना द्यावी. जेणेकरून अशा आपत्तीजनक घटना सर्वांच्या सहकार्याने टाळता येणे शक्‍य होणार आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.

चक्रीवादळात केळीच्या बागा भुईसपाट; विंग परिसरात 20 लाखांचे नुकसान

Inform MSEDCL Of The Damage Caused By The Cyclone Tauktae

loading image