esakal | पाचगणीच्या प्रकल्पाला सर्वतोपरी सहकार्य करू; केंद्रीय पथकाची नगराध्यक्षांना ग्वाही
sakal

बोलून बातमी शोधा

Swachh Bharat Mission

स्वच्छ भारत अभियानांतर्गत पाचगणी येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प भेटीसाठी संचालक बिनय झा यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पथक पाचगणी शहरात आले होते.

पाचगणीच्या प्रकल्पाला सर्वतोपरी सहकार्य करू

sakal_logo
By
रविकांत बेलोशे

भिलार (सातारा) : जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आणि शैक्षणिक केंद्र असूनही फ्लोटिंग पॉप्युलेशनमुळे उद्‌भवणाऱ्या समस्यावर मात करून पाचगणी शहराने (Panchgani City) स्वच्छतेत आदर्शवत काम उभारले आहे. या पालिकेची स्वच्छता क्षेत्रातील कामगिरी प्रशंसनीय असून, पाचगणीला सर्वतोपरी सहकार्य करू, असे अभिवचन स्वच्छ भारत मिशनचे (Swachh Bharat Mission) संचालक बिनय झा (Director Binay Jha) यांनी दिले. (Inspection Of Solid Waste Project At Panchgani By Swachh Bharat Mission Team bam92)

स्वच्छ भारत अभियानांतर्गत (Swachh Bharat Abhiyan) पाचगणी येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प (Solid Waste Management Project) भेटीसाठी श्री. झा यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पथक (Central Squad) पाचगणी शहरात आले होते. या वेळी नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर (Mayor Lakshmi Karadkar), मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी पालिकेने राबविलेले विविध उपक्रम या पथकाला दाखवले. पालिकेने उभारलेल्या स्वच्छ भारत पॉइंटचे श्री. झा यांनी कौतुक केले. या वेळी पथकाने पाचगणीत शंभर टक्के कचरा विलगीकरण होतो का, याची पाहणी केली.

हेही वाचा: गुणवत्ता संपविण्याचा ठाकरे सरकारचा डाव; भाजप नेत्याची टीका

कचरा विलगीकरणाबाबत पालिकेने राबविलेल्या उपक्रमाची श्री. झा यांनी विस्तृत माहिती घेतली. सार्वजनिक शौचालये, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचऱ्याचे विघटन, एसटीपी प्लॅन्टची पाहणी पथकाने केली. शहरातील संपूर्ण स्वच्छतेचीही झा यांनी माहिती घेतली. स्वच्छ भारत पॉइंटवर उभारण्यात येणाऱ्या बायोगॅस प्रकल्पाची माहितीही त्यांनी घेतली. या वेळी झा यांनी पालिका प्रशासनाने स्वच्छता अभियानात सातत्य ठेवल्याबद्दल नगराध्यक्ष व कर्मचारी, पर्यटक आणि पाचगणीकरांचे विशेष कौतुक केले. पालिकेच्या नावीन्यपूर्ण, तसेच अनुकरणीय उपक्रमांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचे अभिवचनही त्यांनी दिले.

Inspection Of Solid Waste Project At Panchgani By Swachh Bharat Mission Team bam92

loading image