
कोळे : बाजारपेठेत वर्दळीच्या रस्त्यावर सापडलेले सुमारे दीड तोळ्याचे गंठण विंग (ता. कऱ्हाड) येथील महिलांनी संबंधितास परत केले. शोभा शिंदे, मनीषा देसाई या महिलांसह अनुष्का देसाई यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे ग्रामस्थांतून कौतुक होत आहे. सोन्याचा दागिना परत मिळताच मुंबईस्थित दांपत्याने सुटकेचा निःश्वास टाकत महिलांचे कौतुक केले. भेटवस्तू देऊन ऋण व्यक्त केले.