

Rahimatpur Nagaradhyaksha Vaishali Mane receiving greetings after assuming office.
Sakal
-जगन्नाथ माळी
उंडाळे : येथील कन्या वैशाली नीलेश माने यांनी रहिमतपूर (ता. कोरेगाव, जि. सातारा) नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षा म्हणून निवडून येत माहेरच्या गावाचा नावलौकिक वाढवला आहे. त्यांच्या या यशामुळे उंडाळे गावात आनंदाचे वातावरण असून, सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.