
कऱ्हाड : इन्स्टाग्रामवरील मेसेजवरून मुजावर कॉलनी येथील एकास काठी व फरशीने बेदम मारहाण झाली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून, दोघांना अटक केली आहे, तर अन्य दोघे अल्पवयीन असल्याने त्यांना बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संबंधितांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.