धोम, नीरा-देवघरचा आराखडा तयार करा; जलसंपदामंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Minister Jayant Patil
Minister Jayant Patilesakal

खंडाळा (सातारा) : खंडाळा तालुक्यातील धोम-बलकवडी व नीरा-देवघर (Dhom Nira-Devghar Project) तसेच वाई तालुक्यातील कवठे-केंजळ, नागेवाडी व जांभळी येथील उपसा जलसिंचनासंदर्भात (Irrigation System) लवकरच आराखडा तयार करून शासनास सादर करावा, अशा सूचना जलसंपदामंत्री जयंत पाटील (Minister Jayant Patil) यांनी मुंबई येथील बैठकीत दिल्या. मंत्रालयात जलसपंदामंत्र्यांसमवेत आमदार मकरंद पाटील (MLA Makarand Patil) यांनी या विषयासंदर्भात बैठक आयोजिली होती. (Instructions To Minister Jayant Patil Officers To Prepare Dhom Nira-Devghar Project Plan Satara Marathi News)

Summary

खंडाळा तालुक्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांच्या मागण्यांना आमदार पाटील यांच्या प्रयत्नामुळे न्याय मिळणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

या वेळी मकरंद पाटील, जलसपंदाचे सचिव बी. के. गौतम, श्री. कुहिरकर, कार्यकारी संचालक श्री. गुणाले, पी. एन. मुंडे, पुणे प्रकल्प मंडळ अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे, सातारा प्रकल्प अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ, नीरा-देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल आदी मान्यवर उपस्थित होते. खंडाळा तालुक्यातील धोम-बलकवडी कालव्याच्या वरील बाजूस असल्याने लाभक्षेत्रापासून वंचित असलेल्या ११ गावांना कालव्यातून उपसा पध्दतीने पाणी मिळण्याबाबत आणि नीरा-देवघर प्रकल्पांतर्गत शेखमिरेवाडी, गावडेवाडी व वाघोशी येथे उपसा सिंचन योजनांबाबत निविदा काढण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

Minister Jayant Patil
कोरोना तपासणी नाकारल्यास कारवाई करा; गृहराज्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना सक्त आदेश

या वेळी वाघोशीच्या पुढे नीरा-देवघरच्या कालव्याचे (Nira-Devghar canal) काम पूर्ण करण्यासाठी निधीच्‍या भरीव तरतुदीबाबत सकारात्मक विचारविनियम या बैठकीत झाल्याचे सांगण्यात आले. याप्रमाणेच वाई तालुक्यातील कवठे-केंजळ उपसा जलसिंचन योजना, नागेवाडी पाटबंधारेची उर्वरित कामे व जांभळी खोऱ्यातील उपसा जलसिंचन या विषयावरही चर्चा करण्यात आली. यामुळे दोन्हीही तालुक्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांच्या मागण्यांना आमदार पाटील यांच्या प्रयत्नामुळे न्याय मिळणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. तसेच खंडाळा तालुका विकास प्रतिष्ठानच्या वतीनेही तालुक्यातील पाणीप्रश्नावर अनेक वेळा पाठपुरावा केला होता. यामुळे त्यांच्याही प्रयत्नाला यश मिळणार आहे.

प्रणवचा मृतदेह तरंगताच कुटुंबीयांचा आक्रोश; अख्ख गाव हळहळले

Instructions To Minister Jayant Patil Officers To Prepare Dhom Nira-Devghar Project Plan Satara Marathi News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com