

Police Crack Down on Inter-District Ganja Syndicate; Three Held in Latest Operation
sakal
कऱ्हाड : गांजाप्रकरणी शहर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासाची व्याप्ती वाढत चालली असून, यापूर्वी शहरासह पाटण तालुक्यातील चौघांना अटक करण्यात आली, तर आता याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील तिघांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. बिरा ऊर्फ महाराज अंतू मासाळ (वय ४३, रा. गोनेवाडी, ता. मंगळवेढा), रामेश्वर बिरा लोखंडे (वय २७, रा. गोनेवाडी) आणि शरद भाऊसाहेब पवार (वय २७, रा. वाकीघेर्डी, ता. सांगोला) अशी संबंधितांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.