दहावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने आयटीआयमध्ये मेकॅनिकल ड्राफ्ट्समन या शाखेत प्रवेश घेतला. तिथे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने पुण्यात फोर्स मोटर्समध्ये इंटरशिप पूर्ण केली.
-स्वप्नील शिंदे
International Women's Day Isha Patukale Success Story : मेकॅनिकल इंजिअरिंगमध्ये (Mechanical Engineering) महिलांचे प्रमाण अत्यल्प असताना साताऱ्यातील एक तरुणी मागील दोन वर्षांपासून कूपर कंपनीच्या (Cooper Company) ट्रॅक्टर युनिटमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. ती जिद्दी तरुणी म्हणजे ईशा पाटुकले.