Shivendraraje Bhosale : योग जीवनाचा अविभाज्य घटक बनवा : शिवेंद्रसिंहराजे भोसले; जिल्हा क्रीडा संकुलात योगदिन साजरा
Satara News : शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी व आयुष विभाग यांच्या वतीने येथील जिल्हा क्रीडा संकुलात योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. श्री. भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून योग दिनास प्रारंभ झाला.
सातारा : योगाला पूर्वापार चालत आलेली आपली मोठी परंपरा आहे. योगामुळे आरोग्य चांगले राहून मनःशांती मिळते. प्रत्येकाने योगासने रोज करून आपल्या जीवनात योगाला अविभाज्य घटक बनवा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.