सिनेमागृहे उपलब्ध झाल्यास मराठी सिनेमाला ऊर्जितावस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Makrand Anaspure

सिनेमागृहे उपलब्ध झाल्यास मराठी सिनेमाला ऊर्जितावस्था

मराठी चित्रपटांचे आशय, मांडणी, कथा उत्तम व दर्जेदार असते. तरीदेखील बहुतांश मराठी चित्रपटांना अद्यापही चांगले दिवस आले नाहीत. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या चित्रपटांना सिनेमागृहे उपलब्ध करून दिल्यास निश्‍चितपणे मराठी चित्रपटांना ऊर्जितावस्था येईल, असे मत अभितेने मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले.

तिसऱ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनप्रसंगी कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी मुलाखत घेऊन त्यांचा जीवनप्रवास, नाम फाउंडेशनचे काम, चित्रपटातील पदार्पण यांसारख्या विविध विषयांवर बोलते केले. ‘‘वयाच्या चौथ्या वर्षापासून अभियानाला सुरुवात केली. या क्षेत्रात आल्यानंतर ‘आप्पासाहेब जिंदाबाद’ हे माझे नाटक होते. त्यानंतर व्यावसायिक नाटकाला सुरुवात केली. पदवीचे शिक्षण औरंगाबादला घेताना ५०० नाटके केली. १९९४ मध्ये मुंबईत आल्यानंतर सुरुवातीला आमदार निवासात राहत होतो. त्या ठिकाणी अनेक अडथळे आल्याने आमदार निवासाने जगणं शिकविले. हळूहळू या क्षेत्रातील ओळखी होत गेल्यानंतर नाना पाटेकर यांनी ‘यशवंत’ या पहिल्या चित्रपटात घेतले.’’

मला अनेक चित्रपटात विनोदी भूमिका मिळत गेल्याने त्या प्रकारच्या भूमिकांचा बाज वाढत गेला. गंभीर भूमिका मिळायला उशीर झाला. परंतु, भूमिका मिळाल्यावर योग्य न्याय दिला. शेतकरी बांधवांसाठी नाम फाउंडेशनने चळवळ उभी केली. गेल्या साडेसात वर्षांपासून ‘नाम’मधून विविध ठिकाणी साडेसहा टीएमसी पाणी अडवून त्या ठिकाणचा परिसर हिरवागार केल्याचे श्री. अनासपुरेंनी सांगितले.

चार वर्षांत केले ४६ चित्रपट

मी सुरुवातीला खूप काम करत असल्याने चार वर्षांत ४६ चित्रपटांत काम केले होते. त्या दैनंदिन व्यस्ततेमुळे कुटुंबालाही वेळ देणे शक्य नसल्याने मी २०११ मध्ये ‘डॅम्बिस’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यानंतर एकाही चित्रपटाचे दिग्दर्शन केले नाही. परंतु, दिग्दर्शन माझी आवड असून, अभिनय हा माझ्या रक्तात असल्याचे मकरंद अनासपुरे यांनी सांगितले.

Web Title: Interview With Actor Makrand Anaspure Satara

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top