esakal | IPL वर सट्टा,12 जणांवर गुन्हा; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

बोलून बातमी शोधा

ipl
IPL वर सट्टा,12 जणांवर गुन्हा; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
sakal_logo
By
किरण बाेळे

फलटण शहर : शहरातील मलठण भागात चालत असलेल्या आयपीएल मॅचेसवर सट्टा व मटका घेतल्याप्रकरणी शहर पोलिसांनी 12 जणांवर गुन्हा नोंद केला आहे. घटनास्थळावरून दोन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, तिघांना अटक केली आहे.

शहर पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, की काल साडेआठच्या सुमारास शहरातील खंडोबा मंदिर जवळील जयकुमार पवार यांच्या दुमजली घराच्या वरच्या मजल्यावर पोलिसांनी छापा टाकला. या वेळी तेथे मोबाईलवर व रोख स्वरूपात पैसे घेऊन आयपीएल क्रिकेट मॅचेसवर व कल्याण मटक्‍यावर जयकुमार शंकरराव पवार (रा. मलठण), वैभव सुनील जानकर (रा. शुक्रवार पेठ) व शशांक प्रशांत लांडे (रा. पुणे) हे आयपीएल क्रिकेट मॅच व मटक्‍यासाठी फोनद्वारे ऑनलाइन व रोख स्वरूपात पैसे स्वीकारत होते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

त्याचबरोबर अमर पिसाळ (रा. मारवाड पेठ), दत्ता कुंभार (रा. वीटभट्टी जवळ मलठण), सुमित चोरमले (रा. धनगरवाडा, बुधवार पेठ), अमित कुरकुटे (रा. उमाजी नाईक चौक), अमोल काळे (रा. दत्तनगर), संतोष काळे (रा. लक्ष्मीनगर, जेबले शंकर मार्केट), शौकत यासीन शेख (रा. बिरदेवनगर, जाधववाडी), नटराज क्षीरसागर (रा. लक्ष्मीनगर, फलटण) या नऊ जणांविरुद्ध पैसे लावल्याप्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याअन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी एक एलईडी टीव्ही, ऍक्‍टिवा मोटरसायकल, चार मोबाईल, रोख रक्कम, कॅल्क्‍युलेटर, कागद, जुगारासाठी लागणारे साहित्य असा एक लाख 98 हजार 837 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबतची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल सचिन मेंगावडे यांनी दिली असून, तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन राऊळ करीत आहेत.

Video पाहा : आम्हीच जिंकू; चंद्रकांतदादांनी सरकार कसं पडेल तेही सांगून टाकलं

गुंड गज्या मारणेच्या टोळीतील 13 संशयितांना पोलिस कोठडी

अभिमानास्पद! जिद्दीच्या जोरावर हेळगावची अंकिता सैन्यात भरती