esakal | अभिमानास्पद! जिद्दीच्या जोरावर हेळगावची अंकिता सैन्यात भरती

बोलून बातमी शोधा

Ankita Nalawade

अभिमानास्पद! जिद्दीच्या जोरावर हेळगावची अंकिता सैन्यात भरती

sakal_logo
By
गजानन गिरी

मसूर (सातारा) : भारतभूमीच्या रक्षणासाठी अनेक ध्येयवेडे जवान जिल्ह्याने दिले आहेत. हेळगाव (ता. कऱ्हाड) या ठिकाणचे अनेक जवान सैन्यात कार्यरत आहेत. मात्र, याच गावच्या अंकिता रघुनाथ नलावडे या युवतीने जिद्द व चिकाटीच्या जोरावर सैन्यात भरती होऊन तरुणींसमोर आदर्श ठेवला आहे. सैन्यदलात भरती होणारी ही कऱ्हाड तालुक्‍यातली पहिलीच युवती आहे.

पोलिस दलात कार्यरत असलेल्या रघुनाथ नलावडे यांनी कन्या अंकिताला सैन्यात भरतीसाठी प्रोत्साहन दिले. अंकिताने वडिलांची इच्छा पूर्ण करण्याची जिद्द बाळगली. नववीपासूनच तिने पोलिस व सैन्यभरतीसाठी तयारी सुरू केली. बारावीनंतर पदवीपर्यंतचे शिक्षण घेत असतानाच तिने पोलिस भरती व सैन्यभरतीसाठी वारंवार प्रयत्न केले. पदवीच्या अंतिम वर्षात असतानाच तिची सैन्यात सशस्त्र सीमादलात निवड झाली.

दहा दिवसांच्या एकांतवासातून बरंच काही शिकलो अन् कोरोनाला हरवलोच!

लेखी परीक्षेनंतर रायगडला शारीरिक चाचणी झाल्यानंतर मध्यप्रदेशातील भोपाळला प्रशिक्षणासाठी अंकिता रवाना झाली आहे. या निवडीबद्दल अंकिताचे ग्रामपंचायत, विकास सेवा सोसायटी, विविध संस्थांचे पदाधिकारी, विविध मान्यवर व ग्रामस्थांनी अभिनंदन केले. अंकिता ही कऱ्हाड तालुक्‍यातील सैन्यात भरती होणारी पहिली सुकन्या ठरली आहे. हेळगावकरांच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे. या निवडीबद्दल अंकिताचे विविध संस्था, संघटनांतर्फे अभिनंदन करण्यात आले.

धीर सोडू नका, आम्ही तुमच्या सोबत! साताऱ्यात 25 कुटुंबं कोरोना संकटातून सहीसलामत बाहेर

तरुणींनी आपणही काही कमी नाही, हे दाखवायचे दिवस सध्या आहेत. सैन्यदलात तरुणींना मोठी संधी आहे. ग्रामीण भागातील तरुणींकडे मोठी गुणवत्ता असते. त्यांनी त्यातून भरती व्हावे.

-अंकिता नलावडे, हेळगाव

Edited By : Balkrishna Madhale