esakal | हेरिटेज वृक्षांच्या नुकसानीचा मुद्दा वीज कंपनीने लावला धुडकावून
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavitran

हेरिटेज वृक्षांच्या नुकसानीचा मुद्दा वीज कंपनीने लावला धुडकावून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड - वीज कंपनीकडून वीज वितरणात वीज वाहून नेण्यास वृक्षांच्या फांद्याची अडचण होत आहे. त्यापासून सरंक्षण गरजेचे आहे. ती अडचण सोडवण्याच्या अपिरहार्य व जनहीतासाठीच वृक्षांच्या फांद्या तोडल्या आहेत. त्यासाठी वीज कंपनीला असतेवीज कायदा २००३ च्या कलम १६८ नुसार अधिकारही आहे, असा खुालास वीज कंपनीने केला आहे. पालिकेने वीज कंपनीला वृक्षांच्या फांद्या तोडल्याबद्दल प्रती वृक्ष एक लाख प्रमाणे दंडाची नोटीस बजावली होती. पालिकेचा दावा वीज कंपनीने धुडकावून लावत नोटीसीचा सविस्तर खुलासा केला.

वीज कंपनीने केलेल्या खुलाशानुसार जनहीताचा विचार करून वृक्षांच्या फांद्या छाटल्या आहेत. वीज कंपनीला वीज कायदा २००३ च्या कलम २६८ नुसार तो अधिकार प्राप्त होतो आहे. त्यामुळे पालिकेचे हेरिटेज वृक्षांचे नुकसान केल्याचा ठपका वीज कंपानीने धुडाकवून लावला आहे. पालिकेने हेरिटेज वृक्षांचे नुकसान केल्याचा दावा केला आहे. ती वस्तूस्थिती नाही, अशे वीज कंपनीने त्यांच्या खुलाशात म्हटले आहे. वृक्षांच्या फांद्या छाटून इजा पोविल्याच्या मजकूर पालिकेने रचनात्मकरित्या कथन कलेला आहे. मात्र तशी वस्तूस्थित नाही.

हेही वाचा: शेतकऱ्यांच्या सोयाबीनवर व्यापाऱ्यांचा दरोडा; 'बळीराजा' संघटनेचा आरोप

त्यामुळे ती आम्हाला मुळीच मान्य नाही. पालिकेने नोटीमीत नमुद केले कायद्याचे कलम ८ (१) चे उल्लघंन केल्याचे व त्यानुसार वृक्षांना इजा केल्याचे कलम २० (क) अन्वये नोटीस दिल्याची माहीती व लेखी खुलासा देण्यासाठी २१ मधील तरतुदीनुसार प्रतीवृक्ष एक लाखांचा दंड आकारण्याचा केलेला उल्लेख मुलतः कायद्यातील तरतुदीशी विसंगत अशी आहे. कारण कंपनी कवळ जनहिताच्या दृष्टीनेच विद्युत कायदा २००३ मधील अधिकारानुसार वीज वहनाचे अडथळे दुर करून त्यावर येणारे वृक्षांच्या फांदया छाटणे आवश्यत असते. परतु वृक्षाला इजा पोचविण्याचा उद्देश नसतो. जाणुन बुजुन वृक्ष छाटली जात नाहीत. कंपनीकडून वीज वीज वितरणाचे कामात वीज वहनास सुरक्षा ठेवण्यासाठी अडथळे त्यात वृक्षांच्या फांदयापासुन संरक्षण करणे आवश्यक आहे यामुळे तशी कार्यवाही वीज वहनाच्या कामात करणे अत्यावश्यक व अपरिहार्य असते याची नोंद घेणे आवश्यक आहे त्यामुळे तो कसलाही गुन्हा होत नाही.

loading image
go to top