esakal | राजे गटातच पडली फूट; जाधववाडीच्या निवडणुकीची वाढली चूरस
sakal

बोलून बातमी शोधा

राजे गटातच पडली फूट; जाधववाडीच्या निवडणुकीची वाढली चूरस

ग्रामपंचायतीवर आपलीच सत्ता आणण्यासाठी आजी-माजी सरपंच, उपसरपंचांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असून, विजयासाठी सर्वांनी चांगलीच कंबर कसली आहे.

राजे गटातच पडली फूट; जाधववाडीच्या निवडणुकीची वाढली चूरस

sakal_logo
By
अशाेक सस्ते

आसू (जि. सातारा) : फलटण शहरालगत असलेल्या आणि राजकीयदृष्टया महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या जाधववाडी (फ) ग्रामपंचायत (Gram Panchayat Election) निवडणुकीत तीन वॉर्डांत राजेगटातील दोन गटांमध्ये सरळ लढत होत आहे. तर एका वॉर्डात राजे गटाचा तिसरा गट आणि अपक्षांत लढत होत असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत चारही वॉर्डांत दुरंगी लढत होत असली तरी विधान परिषदेचे सभापती ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्या गटात फूट पडल्याचे स्पष्ट हाेत आहे.

एकूण चार वॉर्ड अंतर्गत 11 सदस्य संख्या असून, या 11 जागांसाठी 22 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यात वॉर्ड क्रमांक दोन, तीन, चारमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत राजेगटाच्या राजे गट विकास पॅनेल व निष्ठावंत राजे गट पॅनेल अशी समोरासमोर लढत होत आहे. वॉर्ड क्रमांक एकमध्ये दोन जागांसाठी अपक्ष राजे गटाच्या तिसऱ्या गटाशी लढत देत आपले नशीब अजमावत आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हीच बाजा मारणार; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा दावा  

मागील निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत राजेगट विरुद्ध स्थानिक विकास आघाडी अशी सरळ दुरंगी लढत झाली होती. यावेळेस वॉर्ड रचनेतही थोडासा बदल झाला असून, वॉर्ड क्रमांक एकची एक जागा कमी होऊन दोन जागांचा, तर वॉर्ड क्रमांक चारमध्ये एका जागेची वाढ होऊन तो तीन जागांचा झाला आहे. त्यामुळे बरीच सूत्रे बदलून गेली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत राजे गटाचे तीन गट आपले स्वतंत्र अस्तित्व अजमावत आहेत.
 
विद्यमान सरपंच मुनिष जाधव यांच्या नेतृत्वाखालील राजे गट विकास पॅनेल आणि माजी सरपंच हरिभाऊ जमदाडे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत निष्ठावंत राजे गट पॅनेल वॉर्ड क्रमांक दोन, तीन व चारमध्ये समोरासमोर लढताना दिसत आहेत, तर वॉर्ड क्रमांक एकमध्ये दोन जागांसाठी राजेगटाला मानणाऱ्या श्री बिरदेव परिवर्तन पॅनेल आणि अपक्षांमध्ये सरळ होत असल्याचे चित्र आहे. यामध्ये विद्यमान उपसरपंच नंदिनी ज्ञानेश्वर सावंत आणि विमल विलास भिसे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. सर्व लढती चुरशीच्या होणार असल्याची चर्चा आहे. 

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांत रंगली अर्धा तास चर्चा; माजी मुख्यमंत्र्यांचे स्मितहास्य गुलदस्त्यात

निवडणुकीतील कळीचे मुद्दे... 

दरम्यान, जाधववाडी स्मार्ट सिटी अंतर्गत गटारमुक्त गाव, अवैध धंद्यांना बंदी, ओपन स्पेसमध्ये नानानानी पार्क यांसह शुद्ध पाण्यासाठी सार्वजनिक पाणीपुरवठा योजना या मुद्‌द्‌यांवर यंदाची निवडणूक लढवली जात आहे. ग्रामपंचायतीवर आपलीच सत्ता आणण्यासाठी आजी-माजी सरपंच, उपसरपंचांनी आपली प्रतिष्ठा पनाला लावली असून, विजयासाठी सर्वांनी चांगलीच कंबर कसली आहे.

Edited By : Siddharth Latkar

loading image