Karad Crime:'जखिणवाडीतील खूनप्रकरणी पाच जण पोलिसांच्या ताब्यात'; दाेन अल्पवयीन मुलांचा समावेश
Five Arrested in Jakhinwadi Murder Case: शनिवारी सायंकाळी खून झाल्यानंतर संशयितांनी पलायन केले होते. तेव्हापासून पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू होता. आज पोलिसांना संशयितांना ताब्यात घेण्यात यश आले आहे. ताब्यातील संशयितांपैकी दोघे अल्पवयीन आहेत.
कऱ्हाड: जखिणवाडीतील युवकाच्या खूनप्रकरणी शहर पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले. त्यात दाेघा अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. उर्वरित तिघा संशयितांकडे रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी सुरू होती.