esakal | समाज घडणीत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची: प्रा. जालींदर काशिद
sakal

बोलून बातमी शोधा

समाज घडणीत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची: प्रा. जालींदर काशिद

शिक्षकांनी त्यावर मात करून आपली भूमिका पार पाडली पाहिजे, असे मत इन्व्हायरो क्लबचे अध्यक्ष प्रा. जालिंदर काशिद यांनी व्यक्त केले.

समाज घडणीत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची: प्रा. जालींदर काशिद

sakal_logo
By
- हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा): प्रत्येक व्यक्ती गुरुच्या भूमिकेत काम करते. समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. अनेक शिक्षकांनी आदर्शात्मक काम केले आहे. सर्वांनी शिक्षकांचा आदर राखला पाहिजे. शिक्षकांपुढे अनेक आव्हाने आहेत. तरीही शिक्षकांनी त्यावर मात करून आपली भूमिका पार पाडली पाहिजे, असे मत इन्व्हायरो क्लबचे अध्यक्ष प्रा. जालिंदर काशिद यांनी व्यक्त केले.

हेही वाचा: कऱ्हाड : उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरा- प्रहार संघटना

इन्व्हायरो फ्रेंड्स क्लब व विजय दिवस समारोह समितीच्यावतीने विजय दिवस समारोह समितीच्या कार्यालयात नगरसेवक विजय वाटेगावकर, बाळासाहेब मोहिते व वृक्षमित्र चंद्रकांत जाधव यांच्या उपस्थितीत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी नगरसेवक श्री वाटेगावकर, श्री मोहिते यांच्या हस्ते रमेश पवार प्रा. भगवान खोत, प्रा संतोष आंबवडे, प्रा. डॉ. स्नेहल राजहंस, तानाजी बुरुंगले, सैफुला मोमीन, श्री. आत्तार आदी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. प्रा. खोत यांनी सद्गुरू गाडगे महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, साने गुरुजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, शिक्षण महर्षी डॉ बापूजी साळुंखे यांचे शैक्षणिक योगदान स्पष्ट करुन शिक्षकांची समाज व राष्ट्र उभारणीत महत्वाची भूमिका असल्याचे सांगितले.

हेही वाचा: कऱ्हाड: सरपंच परिषदेची कार्यकारिणी जाहीर

प्रा. संतोष आंबवडे, रमेश पवार यांनी मनोगत व्यक्त केले. श्री मोहिते यांनी भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे पहिले शिक्षक होते. ते पुढे राष्ट्रपती बनले म्हणून त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन ‌म्हणून साजरा केला जातो, असे सांगितले. नगरसेवक विजय वाटेगावकर यांनी समाजात शिक्षकांचे स्थान कायम महत्वपूर्ण राहील असे सांगीतले. सतिश बेडके यांनी मनोगत व्यक्त केले. विजय दिवस समारोह समितीचे सहसचिव विलासराव जाधव यांनी आभार मानले.

loading image
go to top