esakal | 'सोमय्या साहेब, सत्तेच्या घशातील आमचा कारखाना आम्हाला परत मिळवून द्या' I Kirit Somaiya
sakal

बोलून बातमी शोधा

Kirit Somaiya

जरंडेश्वर कारखान्यासाठी (Jarandeshwar Factory) आम्ही 40 वर्ष घालवली.

'सोमय्या साहेब, सत्तेच्या घशातील आमचा कारखाना आम्हाला परत मिळवून द्या'

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

सातारा : जरंडेश्वर कारखान्यासाठी (Jarandeshwar Factory) आम्ही 40 वर्ष घालवली. ज्येष्ठ नेत्या शालिनीताई पाटील (Shalinitai Patil) यांनी आमच्यासाठी खूप खस्ता खाल्या. कोरेगाव-खटाव तालुक्यातील जनतेने शालिनीताईंना कारखाना उभारण्याची मागणी केली. ताईंनी रात्रीचा दिवस करुन कारखाना उभारलाय. कारखाना खूप चांगल्या पद्धतीने चालला होता. परंतु, आता सत्तेच्या जोरावर बेकायदेशिररित्या कारखाना ताब्यात घेण्यात आलाय, असा आरोप जरंडेश्वर कारखान्याच्या सभासदांनी किरीट सोमय्यांना हकीकत सांगताना केला.

भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) आज (बुधवार) सातारा, बारामती दौऱ्यावर आले आहेत. पहाटेच्या सुमारास साोमय्यांचे साताऱ्यातील रेल्वे स्थानाकावर आगमन झाले. त्यानंतर आज सकाळच्या सुमारास ते कोरेगाव येथील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना स्थळावर गेले. तेथे त्यांची कारखान्याच्या सभासदांनी भेट घेतली. त्यावेळी सभासदांनी ह्या कारखानाबाबत सोमय्यांकडे व्यथा मांडली.

हेही वाचा: दादा, आम्हालापण 'संचालक' करा की..

सोमय्या साहेब, आम्ही विचार करीत आहोत असं का घडलं. हा कारखाना सामान्य माणसांचा आहे. हा कारखाना कोण गिळकृंत करीत असेल, तर आम्हाला बघवत नाही. तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही काही करा, कसेही करा आम्हाला कारखाना पुन्हा मिळवून द्या. सत्तेच्या जोरावर बेकायदेशिररित्या कारखाना ताब्यात घेण्यात आलाय. आमची एकच इच्छा आहे, पुन्हा जरंडेश्वर कारखाना सभासदांचा व्हावा, अशी मागणी सोमय्यांकडे जरंडेश्वर कारखान्याच्या सभासदांनी कारखानास्थळावरच केली.

loading image
go to top