जावळीत जनता कर्फ्यूला 'येथे' झाला विरोध

प्रशांत गुजर
Tuesday, 15 September 2020

जावळी तालुक्‍यात प्रशासकीय पातळीवर अधिकारी व कर्मचारी हे कोरोनाला रोखण्यासाठी जिवावर उदार होऊन उपाययोजना करत आहेत. 

सायगाव (जि. सातारा) : जावळी तालुक्‍यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता व्यापारी व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सरपंचासह काही प्रमुख व्यक्तींना बोलावून कोरोना साखळी तोडण्यासाठी तालुक्‍यातील दुकाने, व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु, आनेवाडी, सायगाव व केळघर येथील व्यावसायिकांनी बाजारपेठा सुरूच ठेवल्याने बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
 
गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितची एक हजाराच्या वर गेलेली आकडेवारी पाहता तालुक्‍यातील व्हॉट्‌सऍप ग्रुपच्या माध्यमातून चर्चा होवून उपसभापती सौरभ शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सयाजीराव शिंदे, शशिकांत गुरव, संतोष वारागडे यांच्यासह तालुक्‍यातील समाजिक कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात पाच ते आजअखेर तालुक्‍यात जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरविण्यात आल होते. तशा प्रकारच्या सूचना व आवाहनही करण्यात आले.

Video : शिवेंद्रसिंहराजेंनी स्ववास्तूत उभारले कोविड सेंटर 

त्याप्रमाणे तालुक्‍यातून चांगला प्रतिसाद मिळत जनता कर्फ्यू यशस्वीही झाला. मात्र, केळघर, आनेवाडी व सायगाव विभागातील बजारपेठेतील व्यापाऱ्यांनी व्यवसाय चालू ठेवत जनता कर्फ्यूला विरोध केला. आता जनता कर्फ्यू संपल्याने आजपासून तालुक्‍यातील बाजारपेठा सुरळीत सुरू झाल्या आहेत. जावळी तालुक्‍यात प्रशासकीय पातळीवर अधिकारी व कर्मचारी हे कोरोनाला रोखण्यासाठी जिवावर उदार होऊन उपाययोजना करत आहेत.

आजपासून सातारा जिल्ह्यात प्रत्येक घरात तपासणी माेहिम  

जावळी तालुक्‍याची कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता कोणतेही राजकारण न करता या बंदमध्ये सर्वांनी सामील होणे गरजेचे होते. मात्र, कोरोनासारख्या संकटात राजकारण होत आहे, ही दुर्दैवी बाब आहे असे मत सामाजिक कार्यकर्ते सयाजीराव शिंदे यांनी व्यक्त केले.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jawali Taluka Lockdown Satara News