
जवान निकम हे मराठा लाईफ इन्फट्रीमध्ये देशसेवा बजावित होते.
देशासाठी कर्तव्य बजावताना जवानाचं निधन; उदयनराजेंनी व्यक्त केलं दु:ख
नागठाणे (सातारा) : अपशिंगे (मिलिटरी, ता. सातारा) येथील जवान सुधीर सूर्यकांत निकम Jawan Sudhir Nikam (वय 37) यांचे कर्तव्य बजावत असताना आज पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या (बुधवारी) सकाळी शासकीय इतमामात अपशिंगे इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सुधीर निकम हे मराठा लाईफ इन्फट्रीमध्ये (Maratha Life Infantry) देशसेवा बजावित होते. सध्या ते गुजरातमधील जामनगर येथे सेवेत होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील रूग्णालयात (Mumbai Hospital) उपचार सुरु होते. अशातच आज पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. सुधीर निकम यांच्या कुटुंबाला लष्करी सेवेची परंपरा होती. त्यांचे वडील सूर्यकांत शंकर निकम हे 1995 मध्ये सिक्कीम इथं कर्तव्य बजावित असताना हुतात्मा झाले होते. त्यांचे धाकटे बंधू सागर हे देखील लष्करी सेवेत कार्यरत आहेत. सध्या ते पंजाबमधील भटिंडा इथं आहेत. सुधीर यांचे चुलते अन् चुलतभाऊ हेदेखील लष्करी सेवेशी संबंधित आहेत.
हेही वाचा: शिवसेनेला संपविण्यासाठी भाजपकडून सातत्यानं प्रयत्न; नीलम गोऱ्हेंचा घणाघात
सुधीर निकम यांची पार्थिवावर उद्या (बुधवारी) सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी गावातून अंत्ययात्रा काढली जाणार आहे. अपशिंगेत असलेल्या विजयस्तंभ येथे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. दरम्यान, जवान निकम यांच्या निधनाबद्दल साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी ट्विटव्दारे दु:ख व्यक्त केलंय.
हेही वाचा: भोंग्यांबाबत न्यायालयीन आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करा : CM बोम्मई
गावाची वाट अधुरीच...
सुधीर हे 20 मे रोजी अपशिंगेला (Apshinge Military) येणार होते. आपल्या मित्रांशी मोबाईलवरुन बोलताना त्यांनी तसे नमूदही केले होते. पुढील वर्षी ते निवृत्त होणार होते. मात्र, त्यांच्या अकाली जाण्यामुळं गावाची वाट अधुरीच राहिली.
Web Title: Jawan Sudhir Nikam Of Apshinge Passed Away
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..