
'राज ठाकरेंकडून भोंग्यांच्या निमित्ताने स्वतःच्या पक्षाला संजीवनी देण्याचा प्रयत्न सुरू आहे.'
शिवसेनेला संपविण्यासाठी भाजपकडून सातत्यानं प्रयत्न; नीलम गोऱ्हेंचा घणाघात
सातारा : न्यायालयाचा भोंग्यांच्या बाबतीत स्पष्ट निर्देश असतानाही राज ठाकरेंकडून (Raj Thackeray) भोंग्यांच्या विषयाच्या निमित्ताने स्वतःच्या पक्षाला संजीवनी देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा टोला लगावून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री झाल्याने भाजपमध्ये (BJP) प्रचंड अस्वस्थता आहे. या राजकिय वैफल्यातून त्यांनी जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू केले आहे. शिवसेनेला संपविण्यासाठी भाजपकडून सातत्याने प्रयत्न होत असल्याची टीका विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केली.
उपसभापती गोऱ्हे यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी राज ठाकरे व भाजपवर टीकेची झोड उठवली. गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘भाजप सरकारसोबत युतीत असताना आम्हाला दोन- तीन गोष्टी खटकत होत्या. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या स्मारकांचा विषय असेल या प्रत्येक ठिकाणी डावलणे व अपमानित केले जात होते. २०१४ च्या निवडणुकीत विकासाचा अजेंडा सांगताना फर कॅप घालून मोदींसाहेबांचे फोटो भाजपच्या नेत्यांसोबत दिसत होते. तेथे ही शिवसेनेला डावलले गेले. त्यानंतर एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) युतीचा पोपट मेला आहे, असे सांगितले.
हेही वाचा: अतृप्त आत्मे माझ्या भोवती फिरणार पण नाहीत; वसंत मोरेंचा नेमका कोणाला इशारा?
विधानसभेवेळी युती करताना आमची तर १५५ आमदारांची तयारी चालल्याचे भाजपचे नेते सांगत होते. मुळात दोघांचे आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे होते. मात्र, त्याऐवळी शिवसेनेला संपविण्यासाठी भाजपकडून सातत्याने प्रयत्न चालू होते. लोकांत दिशाभूल करत राहायची. आता हनुमान चालिसाचा विषय काढला असून, ज्यांची श्रद्धा आहे तो कोठेही प्रार्थना करू शकतो. केंद्र सरकारची लाऊड स्पिकरबाबत बंधने आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार निर्णय होतो. अशावेळी चालिसा म्हणणे व भोंग्यांच्या विषयाच्या निमित्ताने स्वतःच्या पक्षाला संजीवनी देण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत. ’’
हेही वाचा: माझी दोन्ही मुलं अपघातात गेली, तेव्हा दिघे साहेबांनी मला..; शिंदेंनी सांगितला कटू प्रसंग
सोमय्यांना प्रश्न...
कोणाची रिसॉर्ट बेकायदेशीर आहेत, त्यांच्यावर प्रशासन कारवाई करेल, साताऱ्यात सोमय्यांनी मोठे नाट्य केले. त्यांनी दहा वर्षांत एक हजार घोटाळे पत्रकार परिषदा घेऊन मांडले. त्यापैकी किती निकाल लागले हे त्यांनी सिद्ध करावेत. समाजात तेढ वाढविणे, संशय कल्लोळ निर्माण करण्याचे काम होत असून, त्याला जनता बळी पडतेय याविषयी विचार करण्याची वेळ आली आहे, असेही गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
Web Title: Shiv Sena Leader Neelam Gorhe Criticizes Bjp At Satara
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..