आनेवाडी : सैनिकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत असताना हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना अडचणीच्या काळात पाठीशी राहण्याचे जयहिंद फाउंडेशनचे काम कौतुकास्पद आहे. शासन दरबारी सैनिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न असेल, असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी केले.