
सातारा : गरजूंना घरे मिळवीत हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात २० लाख घरकुले मंजूर केली आहेत. सातारा जिल्ह्याला ४५ हजार ४२२ घरकुलांचे उद्दिष्ट दिले आहे. या शंभर दिवसांच्या कार्यक्रमात या सर्व घरकुलांना मंजुरी देऊन त्यांना पहिला हप्ता देण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेचे ठेवले आहे. जिल्ह्यातील एकही बेघर घरकुलापासून वंचित राहणार नाही, असा विश्वास ग्रामविकास व पंचायतराजमंत्री जयकुमार गोरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.