
भुईंज : पुणे- बंगळूर महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री कामोठे (मुंबई) येथून विटाला (जि. सांगली) निघालेल्या सोन्या- चांदीच्या व्यापाऱ्यास पाठलाग करत वेळे (ता. वाई) येथे चारचाकी आडवी लावून मारहाण करून लुटल्याची घटना घडली. दरम्यान, या प्रकरणी विनित राधाकृष्णन (वय ३०, रा. पन्नकड, केरळ) यास सांगली पोलिसांनी शिताफिने ताब्यात घेतले असून त्याचे अन्य साथीदार पळून गेले आहेत.