पत्रकारांनी वस्तुनिष्ठ पत्रकारिता करावी ; उत्तम दिघे|satara | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

journalism
पत्रकारांनी वस्तुनिष्ठ पत्रकारिता करावी ; उत्तम दिघे

पत्रकारांनी वस्तुनिष्ठ पत्रकारिता करावी ; उत्तम दिघे

उंब्रज : पत्रकारितेचे स्वरूप बदलत चालले आहे. बदलत्या काळानुरूप साधनांचा अवलंब करत पत्रकारांनी (Journalist) वस्तुनिष्ठ पत्रकारिता करत समाजप्रतीची न्यायिक भूमिका जपावी, असे मत कऱ्हाडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी व्यक्त केले. द पॉवर ऑफ इंडिया मीडिया फाउंडेशन महाराष्ट्र,(The Power of India Media Foundation Maharashtra) सौ. मंगलताई रामचंद्र जगताप महिला महाविद्यालय उंब्रज, रोटरी क्लब ऑफ उंब्रज, वसुंधरा पर्यावरण संशोधन व संवर्धन संस्था उंब्रज यांच्या सयुक्तिक वतीने जगताप महिला महाविद्यालयात आज पत्रकारांना पत्रकार सेवा गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.

हेही वाचा: सातारा : एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

या वेळी ते बोलत होते. या वेळी सायबर पोलिस (Cyber Police)ठाण्याचे निरीक्षक अरुण देवकर, रयत कौन्सिलचे सदस्य द. श्री. जाधव, द पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशनचे राज्य सचिव अनिल कदम, उंब्रज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड, तळबीड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जयश्री पाटील, प्राचार्य संजय कांबळे, द पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशनचे (The Power of Media Foundation)जिल्हाध्यक्ष पराग शेणोलकर आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी ‘सकाळ’चे मुख्य बातमीदार प्रवीण जाधव, वाहगावचे बातमीदार तानाजी पवार, पुढारीचे मसूर विभाग प्रतिनिधी दिलीप माने, प्रभातचे उंब्रज विभाग प्रतिनिधी दिलीपराज चव्हाण, तरुण भारतचे चोरे विभाग प्रतिनिधी दिलीप साळुंखे यांना पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पत्रकार सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हेही वाचा: साथीच्या काळात Immunity वाढविण्यासाठी लाईफस्टाईलमध्ये करा हे बदल

श्री. दिघे म्हणाले, ‘‘आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी वृत्तपत्राची सुरुवात केली. त्याकाळी सामाजिक विषय हाताळून समाज प्रबोधनाचे काम केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले, लोकमान्य टिळक, आगरकर आदी थोर व्यक्तींनीही वेगवेगळी वृत्तपत्रे काढली. सोशीत समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम व त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले. सध्या काळानुरूप पत्रकारितेचे स्वरूप बदलत चालले आहे; परंतु तिचा उद्देश व ताकद आजही तेवढीच आहे. त्यामुळे पत्रकारांनी परिस्थितीचा अभ्यास करून वस्तुनिष्ठ पत्रकारिता करण्याची नितांत गरज आहे.’’ समाजाच्या जडणघडणीत वृत्तपत्रे आणि पत्रकारांचे योगदान मोलाचे असल्याचे निरीक्षक देवकर यांनी सांगितले. या वेळी सहायक निरीक्षक अजय गोरड, संघटनेचे राज्य सचिव अनिल कदम यांनी मनोगत व्यक्त केले. तानाजी कदम यांनी सूत्रसंचालन केले. पराग शेणोलकर यांनी आभार मानले. या वेळी मसूर व उंब्रज विभागातील पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक, प्राध्यापक, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SataraJournalism
loading image
go to top