Jowar Price Hike: वाढत्या महागाईचा घाव ‘भाकरी’वर, ज्वारीचे दर शंभरावर; रब्बी पेरणीचे प्रमाण घटणार, खाणावळींना फटका

Satara Drought, Bhakri Prices Rise : सातारा जिल्ह्यात ज्वारीचे दर किलोमागे १०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे रब्बी ज्वारीची पेरणी घटण्याची शक्यता असून हॉटेल, धाबे आणि खाणावळींमध्ये भाकरीचे दर २५ ते ३० रुपयांपर्यंत वाढले आहेत
Jowar prices have reached ₹100 per kilogram in Satara, pushing up bhakri prices at local eateries.

Jowar prices have reached ₹100 per kilogram in Satara, pushing up bhakri prices at local eateries.

esakal

Updated on: 

सातारा, : महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्य नागरिक आणि कष्टकऱ्यांच्या ताटातील महत्त्वाची असलेली ‘भाकरी’ महाग झाली आहे. जिल्ह्यात ज्वारीचे दर शंभर रुपये किलोपर्यंत गेले आहेत. याचा थेट फटका हॉटेल व्यावसायिक आणि खाणावळींना बसला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा रब्बी ज्वारीची पेरणी घटणार असल्याने आगामी काळात ज्वारी तुटवडा निर्माण होऊन भाकरी आणखी महाग होण्याचे संकेत आहेत. गेल्या काही आठवड्यांत घाऊक व किरकोळ बाजारात ज्वारीची आवक मंदावल्याने दर कमालीचे वाढले आहेत. चांगल्या दर्जाची मालदांडी व शाळू ज्वारीचे दर किरकोळ बाजारात १०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. काही ठिकाणी ज्वारीच्या दर्जाप्रमाणे ज्वारी ७५ ते ८५ रुपयाने विकली जात आहे. कच्च्या मालाचे दर वाढल्याने साताऱ्यातील खाणावळी, धाबे आणि हॉटेल व्यावसायिकांना नाइलाजाने भाकरीचे दर वाढवावे लागले आहेत. यापूर्वी १५ ते २० रुपयांना मिळणारी एक भाकरी आता २५ ते ३० रुपयांपर्यंत विकली जात आहे

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com