Karad News : पालिका शाळेत न्यायाधीश, डीवायएसपी, डॉक्टरांची मुले; ४०० जागांसाठी १२०० पालकांनी लावल्या रांगा

इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांचा लळा पालकांना लागला आहे. त्यामुळे नगरपालिका, जिल्हा परिषद शाळांतील प्रवेशित विद्यार्थ्यांची सख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे.
Karad Municipal School
Karad Municipal Schoolsakal

कऱ्हाड - इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांचा लळा पालकांना लागला आहे. त्यामुळे नगरपालिका, जिल्हा परिषद शाळांतील प्रवेशित विद्यार्थ्यांची सख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. मात्र, याला अपवाद ठरली आहे कऱ्हाड (जि.सातारा) येथील पालिका शाळा क्रमांक तीन. ही शाळा महाराष्ट्रातील सर्वाधिक पटसंख्या असलेली शाळा बनली आहे.

दर्जेदार शिक्षण, पहिलीपासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी, जीव ओतून शिकवणारे शिक्षक, लोकसहभागातून केलेल्या भौतिक सुविधा, शिस्त यामुळे या शाळेचा राज्यात लौकिक झाला आहे. या शाळेतच आपल्या मुलाला प्रवेश मिळावा, यासाठी पालक दरवर्षी पहाटेपासूनच रांगा लावतात. यंदाही पहिलीच्या ४०० जागांसाठी तब्बल ११५७ अर्ज दाखल झाले आहेत.

सरकारी शाळांच्या गुणवत्तेचा प्रश्न

शासन लाखो रुपये खर्च करूनही जिल्हा परिषद आणि पालिका शाळांऐवजी खासगी शाळांना अच्छे दिन आले असल्याचे चित्र आहे. परिणामी, या शाळांकडे बघण्याचा पालकांचा दृष्टिकोन बदलला असून, त्यांनी आपल्या मुलांना खासगी शाळांत घालण्याकडेच मोर्चा वळवला आहे.

मात्र, कऱ्हाडमधील पालिका शाळा नंबर शाळेत आपल्या मुलाला प्रवेश मिळावा, यासाठी सर्वसामान्यांसह पोलिस उपअधीक्षक, मुख्याधिकारी, पोलिस अधिकारी, मंत्रालय अधिकारी, न्यायाधीश, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षकांसह अन्य अधिकारी, कर्मचारीही अर्ज करतात. शाळेतील यंदा राज्यात पहिल्यांदाच एकाच शाळेचे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झाले आहेत.

तीन नंबर शाळेची खासियत

पालिकेची शाळा असूनही या शाळेने बालवाडी सुरू केली आहे. त्यामध्ये सेमी इंग्रजी पॅटर्नमधून शिक्षण दिले जाते. त्या बालवाडीतच पहिलीची तयारी करून घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पाया भक्कम होतो. त्यामुळे विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकतात. त्याचबरोबर शाळेला स्वतःचे विज्ञान केंद्र, स्वतंत्र ग्रंथालय आहे. शाळेचे शिक्षक रजेवर गेल्यावर कधीही त्याला दुसऱ्या वर्गाला जोडले जात नाही.

शाळेने जादा शिक्षक घेतले असून, त्या शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना शिकवले जाते. खेळ शिकवण्यासाठी, चित्रकलेसाठी स्वतंत्र शिक्षक आहेत. देशभरातील इतर शाळांतील चांगल्या उपक्रमांची पाहणी करून शिक्षक या शाळेत विविध उपक्रम राबवतात. पहिलीपासून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्यांना बसवले जाते.

अभ्यासात मागे पडलेल्या मुलांसाठी स्वतंत्र मार्गदर्शन सत्र घेतले जाते. गुणवत्ता हाच केंद्रबिंदू मानून १०० टक्के मुले तयार होण्यासाठी व्हर्च्युअल क्लासरूम, ई-लर्निंग, डिजिटल क्लासरूम या माध्यमांचा प्रभावीपणे वापर केला जातो. एकही विद्यार्थी गैरहजर राहणार नाही, यासाठी शिक्षक प्रयत्नशील असतात.

दर महिन्याला पालक सभा

पालिकेच्या तीन नंबर शाळेत दर महिन्याला प्रत्येक वर्गाची पालक सभा घेऊन त्यात विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा पालकांना सांगितला जातो. त्याचबरोबर शाळेने करार करून स्कूल बसची सुविधा केली आहे. शाळेत विद्यार्थ्यांना कडक शिस्तही लावली जाते. त्याचबरोबर या शाळेतील शिक्षकांचे टीमवर्क चांगले असून, जीव ओतून शिक्षक ज्ञानदान करतात, त्यामुळे राज्याच्या गुणवत्ता यादीत विद्यार्थी चमकतात.

पालिकेची शाळा असूनही खासगी शाळेच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक पटसंख्या असलेली तीन नंबरची शाळा आहे. शाळेत ज्ञानदानाचे पवित्र काम चांगल्या पद्धतीने शिक्षकांच्या टीमवर्कने केले जाते. विद्यार्थ्यांच्या पायाही पहिलीतच भक्कम केला जातो. त्यामुळे विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकतात. यंदा पहिलीच्या प्रवेशाच्या ४०० जागांसाठी ११५७ अर्जांची विक्री झाली आहे.

- अर्जुन कोळी, मुख्याध्यापक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com