
वाई : धोम (ता. वाई) खून खटल्यातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिला येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश श्री. मेहेरे यांनी जामीन मंजूर केला. धोम खून खटल्याची सुनावणी वाई येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात सुरू आहे. मागील सुनावणीच्या वेळी ज्योती मांढरेच्या जामिनाची मुदत संपल्याने ती न्यायालयासमोर हजर झाली. न्यायालयाने तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.