

Satara Woman Jyoti Shelar Inspiring Education Journey DEd BA MA and Her Determination to Fulfill Fathers Dream
esakal
सातारा : काही स्वप्नं परिस्थितीमुळे थांबतात; पण मनातून कधीच संपत नाहीत. अशाच एका स्वप्नाची गोष्ट आहे वाई तालुक्यातील एकसर येथील ज्योती विशाल शेलार यांची. वडिलांना शिक्षक व्हायचे होते; मात्र, प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे ते स्वप्न अपूर्ण राहिले. लेकीने मात्र वडिलांच्या डोळ्यांतील ते स्वप्न ओळखले आणि शिक्षणाची वाट धरली. डी.एड., बी.ए. विशेष श्रेणी आणि मानसशास्त्र विषयातून एम.ए.पर्यंतचा टप्पा गाठत त्यांनी वडिलांच्या स्वप्नाला स्वतःच्या आयुष्याचे ध्येय बनवले. शासानाच्या पवित्र पाेर्टलमधून जिद्द अन् चिकाटीच्या जाेरावर शिक्षक पदाला गवसणी घातली आहे.