Kas Dam current water level in Satara
esakal
कास : सातारा शहराला दररोजचा पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावात सद्य:स्थितीत ४३ फूट पाणीसाठा शिल्लक असून, हा साठा आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरेसा असला तरी नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे. यावर्षी प्रचंड प्रमाणात उष्णता असल्याने आत्तापर्यंत एकूण पाणी पातळीत १८ फूट घट झाली आहे.