मॅटवरील कबड्डीला सहकार्य करणार : नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kabaddi on the mat will cooperate mayor lakshmi larhadkar

मॅटवरील कबड्डीला सहकार्य करणार : नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर

भिलार : कबड्डीला सध्या चांगले दिवस आले असून, तांबड्या मातीत रुजलेली ही कबड्डी जपण्याचे काम पांचगणीतील व्यायाम मंडळ करीत आहे. सध्या बदलत्या काळात मँटवरील कबड्डी आकाराला येत असून, मँटवरील स्पर्धेसाठी या पुढील काळात नगरपालिका सर्वतोपरी मदत करणार असल्याचे प्रतिपादन पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी केले.

पांचगणी येथील व्यायाम मंडळाच्या वतीने आयोजिलेल्या जिल्हास्तरीय व हौशी कबड्डी स्पर्धांचे उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी कऱ्हाडकर बोलत होत्या . या स्पर्धेच्या मैदानाचे फित कापून नगराध्यक्षा कऱ्हाडकर यांनी उदघाटन केले. या वेळी नगरसेविका हेमा गोळे, उज्वला महाडिक, सुलभा लोखंडे, नरेंद्र बिरामणे, अनिल वन्ने, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, निसार सय्यद, राजेंद्र भिलारे, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपूरे, नितीन भिलारे, विठ्ठल गोळे , प्रवीण भिलारे, शेखर कासुर्डे , बापूसाहेब बिरामणे, गॅब्रियल फर्नांडिस, अजित कासूर्डे, यशवंत पार्टे, विनोद कळंबे, शेखर भिलारे तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य, खेळाडू उपस्थित होते.

हेही वाचा: पुसेगावमध्ये सेवागिरी रथोत्सव उत्साहात; आमदारांच्या उपस्थितीत रथपूजन

कऱ्हाडकर म्हणाल्या,‘‘ पांचगणी शहराचा नावलौकीक व्यायाम मंडळाच्या कबड्डीने सर्वदूर पोचला आहे. या मैदानावर खेळलेले खेळाडू निश्चितच राज्य पातळीपर्यंत पोचतील, असा आपणाला विश्वास वाटतो.’’ या वेळी कऱ्हाडकर यांच्या हस्ते क्रीडांगनाचे फित कापून उदघाटन, तर सहायक पोलिस निरीक्षक सतीश पवार यांच्या हस्ते क्रीडांगणाचे पूजन करण्यात आले. मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी सामन्याची नाणेफेक केली. या स्पर्धा सात दिवस चालणार असून, ३५ किलो वजनगटात ३५ संघांनी सहभाग नोंदवला आहे.

३५ किलो वजन गटात आज झालेल्या अटीतटीच्या झालेल्या लढतीत समता गोडवली आणि भैरवनाथ शिंदेवाडी यांच्यात भैरवनाथ शिंदेवाडी यांनी विजय मिळवला. राजेंद्र राजपूरे यांनी प्रास्ताविक केले. संतोष गोळे व प्रमोद पवार यांनी सूत्रसंचालन केले. अंकुश मालुसरे यांनी आभार मानले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SataraKabaddi player
loading image
go to top