
येत्या 19 फेब्रुवारीस छत्रपती शिवाजी महाराज जयंती किल्ले अजिंक्यतारा येथे साजरी केली जाणार आहे. शिवजंयती दिनी नुसतीच हजेरी नकाे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ही रक्ता रक्तात भिनली पाहिजे. त्यांचा केवळ जयजयकार करुन चालणार नाही त्यांचे विचार आचारणात आणा असा सल्ला राजमाता कल्पनाराजे भाेसले यांनी युवा पिढीस दिला.
सातारा : शिवगान स्पर्धेमुळे तरुण पिढीत छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार, विचार रुजणार आहेत, तसेच वैभवशाली इतिहासातून नेतृत्व करण्याची ऊर्मी निर्माण होणार असल्याचे मत राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी व्यक्त केले. खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजिलेल्या शिवगान स्पर्धेची प्राथमिक फेरी भरतमुनी जयंतीनिमित्त घेण्यात आली. त्यावेळी राजमाता कल्पनाराजे भाेसले बाेलत हाेत्या.
राजमाता कल्पनाराजे भोसले म्हणाल्या, ""सर्व धर्मीयांना बरोबर घेऊन कार्य करण्याची पद्धत, शेतकऱ्याची काळजी व शेतीसंबंधी योगदान अशा विविध गुणांचा प्रसार तरुण पिढी आणि समाजात होण्यास मदत होणार आहे. शिवगान स्पर्धेमुळे तरुण पिढीला शिवरायांचा इतिहासाची माहिती मिळणार आहे. युवा पिढी देशाचे भवितव्य आहे. युवा पिढीने राजकारण, समाजकारण छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे सांभाळावे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला परत आल्याचे दिसणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तुत्व, देशप्रेम घेऊन युवा पिढीने पुढे जायचे आहे. अन्याय अजिबात सहन करायचा नाही जे अन्याय करीत असतील त्यांना तिथल्या तिथे धडा शिकविण्याचे काम हे तुम्ही सर्वांनी करायचे आहे. कारण ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांची आहे.
येत्या 19 फेब्रुवारीस छत्रपती शिवाजी महाराज जयंती किल्ले अजिंक्यतारा येथे साजरी केली जाणार आहे. शिवजंयती दिनी नुसतीच हजेरी नकाे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ही रक्ता रक्तात भिनली पाहिजे. त्यांचा केवळ जयजयकार करुन चालणार नाही त्यांचे विचार आचारणात आणा असा सल्ला राजमाता कल्पनाराजे भाेसले यांनी युवा पिढीस दिला.
प्राथमिक फेरीतील वैयक्तिक गटात प्रसन्न रुईकर, प्राजक्ता महामुनी, शर्वरी काशीद व पियुशा भोसले यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ, तर सांघिक गटात म्युझिक वॉरियर ग्रुप पाटण, न्यू इंग्लिश स्कूल सातारा, श्रीराज बर्गे व स्वराली बर्गे, तसेच अण्णासाहेब कल्याणी विद्यालय यांना अनुक्रमे, प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषक मिळाले.
यावेळी महाराष्ट्र भाजप सांस्कृतिक आघाडीचे उपाध्यक्ष पंकज चव्हाण, सांस्कृतिक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक शिरीष चिटणीस, महिला अध्यक्षा वैशाली राजेघाटगे, शहराध्यक्ष कैलास मोहिते, अभिमन्यू तांबे, अतुल पाटोळे, आदित्य शेंडे, अजिंक्य लकडे, अमोल सणस, दीपक क्षीरसागर, नीलेश शहा, सुनिशा शहा, विकास बनकर आदी उपस्थित होते.
एका सिगारेटने केले कोटीचे नुकसान; साताऱ्यात पाच शिवशाही जळून खाक
मराठा आरक्षणाची चळवळ पुढे नेल्यानेच माझ्यावर दबाव टाकला
पुण्याला जाताना तुम्हालाही असा अनुभव आलाय, तर आम्हाला जरुर कळवा..